D – ट्रेडर्सने उदयास आणले ‘अण्णारुपी “रईस”

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारुबंदी हा नेहमीच वादाचा विषय राहीलेला आहे. या दारू तस्करीत अनेक ‘रईस’ उदयास आले आहे व येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी ही वर्धा नदीचे बेलोरा व मुंगोली चेकपोस्ट वरून होत असते. व बेलोरा चेकपोस्ट येथे सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून यांचे नियंत्रण पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूम मधून होत असते. मात्र दारू तस्करीत व तस्करांना तीळ मात्र फरक पडला नाही. वणी तालुक्यातील भालर येथील D – ट्रेडर्स देशी भट्टी दारू विक्रेता असून सूत्रानुसार प्राप्त माहितीच्या आधारे आबकारी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी यांचा नातलग आहे.

यांच्या लागे बंदीमुळे दररोज 90 मि.लीच्या देशी दारूच्या 1200 ते 1500 टिल्लू पेटी 2400 रुपयात घुग्घुस येथील (अण्णाला) पुरवितो हा अण्णा 2800 रुपये प्रमाणे घुग्घुस व चंद्रपूर येथे तस्करी करतो. सदर दारू नागाळा मार्गे पठाणपूरा होत चंद्रपुरात दाखल होते. तेव्हा त्याची किंमत 4000 ते 5000 इतकी होऊन जाते.
400 ते 450 रुपये प्रति पेटी प्रमाणे हा अण्णा 06 लाख ते 07 लाख रुपये दररोज कमावून घुग्घुस येथील नवीन ‘रईस’ म्हणून उदयास आला आहे.
अगदी सकाळी स्कुटी या वाहनावर दोन – दोन पोत्यात ही दारू अगदी घुग्घुस पोलीस स्टेशन समोरुन बिनभोबाट ये – जा करीत असतात.
या दारू तस्करांचे हौसले एवढे बुलंद झाले आहे की चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांना निनावी पत्रा द्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्या जात आहे.
यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी जनसामान्यांची मागणी होत आहे.