के. के. श्रीवास्तव यांचे मोठे बंधु राजेंद्रचे निधन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : दैनिक भास्कर चे गडचांदूर प्रतिनिधी व कोरपना तालुका प्रेस क्लब चे उपाध्यक्ष के. के. श्रीवास्तव सर यांचे मोठे बंधु श्री. राजेंद्र श्रीवास्तव (70) यांचे ग्वालीयर येथे उपचारादरम्यान काल रात्री निधन झाले.

ते वरिष्ठ पत्रकार व मध्य प्रदेश शासन द्वारा अधिमान्य पत्रकार होते तसेच दैनिक देशबंधु ब्युरो प्रमुख व शिक्षा दर्शन चे संपादक ही होते.

आज त्यांच्यावर मुरार मुक्तीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विना श्रीवास्तव, तीन मुले सुना, मुली,जावई व नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहेत.