ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 30 जूनपर्यंत पर्यटकांसाठी Offline सुरू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून 5 दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. ताडोबा व्यवस्थापनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. 15 एप्रिल 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रकल्प बंद करण्यात आला होता. 4 जूनच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरांच्या विविध लेव्हलनुसार सामाजिक- पर्यटन कार्यक्रम राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रकल्पाच्या विविध 6 प्रवेशद्वारावरून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे. ऑनलाईन बुकिंग प्रणाली सुरू नाही. त्यामुळे थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावे लागणार आहे. 1 जुलैपासून पावसाळी नियमाप्रमाणे ताडोबा कोअर क्षेत्र 3 महिने बंद असणार आहे.

ताडोबातील पर्यटन सुरू करण्यासाठी रिसॉर्ट-हॉटेल व्यावसायिक-जिप्सी ऑपरेटर यांचा व्यवस्थापन आणि सरकारवर मोठा दबाव होता. बफर क्षेत्रातील सफारी सुरू करण्यासाठी मात्र नियमांसह स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत.