आता गावातील पथदिवे आणि पाणी पुरवठा योजना राहणार सुरूच

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• पंधराव्या वित्त्‍ आयोगातून अदा करता येणार पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनांचे बिज
• राज्यभरातील ग्राम पंचायतींना मिळणार दिलासा

चंद्रपूर : राज्यभरात गावातील पथदिव्यांचे विजबिल आणि पाणी पुरवठा योजनांची थकबाकी वाढल्याने महावितरणने राज्यभरात गावातील विद्यूत पुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली आहे. पथदिव्यांचा पुरवठा खंडीत करून गावोगावी काळोख निर्माण झालेला आहे. तर पाणी पुरवठा योजनाही प्रभावीत झालेल्या आहेत. महिलांनरा घरात मिळणारे पाणी बंद झाल्याने पुन्हा डोक्यावर हंडा घेण्याची पाळी आली आहे. थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरण कंपनीने राज्यात सुरू केलेल्या कारवाईमुळे राज्यभरात ग्रामस्तरावर प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे. ग्रामस्तरावर विजेअभावी होणारी बिकट परिस्थिती पहाता राज्यातील ग्राम पंचायतींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे गावातील पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनांचा विद्यूत पुरवठा सुरू राहणार आहे. याकरिता पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनांचे विजबिल भरण्याची तरतूद पंधराव्या वित्त आयोगातून केली आहे. याबाबतच 23 जून 2021 ला बुधवारी एक परिपत्रक जारी करून अदा बिल भरण्यासाठी सुचना निर्देशीत केल्या आहेत.

राज्यभरात गावातील पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनांच्या विजेची थकबाकी वाढल्याने महावितरण कंपनी संकटात सापडली आहे. यासंकटातून महावितरणला बाहेर काढण्यासाठी थकीत असलेली वसुली सक्तीने केल्या जात आहे. याकरिता वेळेत विजबिल न भरल्यास गावातील पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनांचे विज खंडीत केल्या जात आहे. राज्यातील अनेक गावात ही कारवाई सुरू असल्याने गावागावात काळोख पसरत आहे. तर घरात मिळणारे पाणी विजेअभावी बंद झाल्याने महिलांनी पुन्हा डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती सुरू केली आहे. शिवाय विज पुरवठ्यामुळे कोरोनाकाळात आरोग्याची परिस्थिती कठीण होत आहे. याप्रकारामुळे ग्राम पंचायत स्तरावरी सरपंचांची विजेबाबत प्रचं ओरड होवुन त्यांनी राज्यसरकारने याबाबत उचित निर्णय घेऊन गावातील विज पुरवठा खंडीत करू नये याकरिता वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न चालविले आहेत.
राज्यातील विजेची परिस्थिती बघता राज्याच्या ग्राम विकास विभागाने काल बुधवारी 23 जून 2021 ला एक परिपत्रक जारी करून विज पुरवठा खंडीत होवू नये याकरिता ग्रामपंचायतींना दिलसादायक ठरणारा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला पंधरावा वित्त आयोगाचा निधी असतो. या आयोगाच्या बंधित आणि अबंधित अनुदानातून पथदिवे आणि नळ पाणी पुरवठा योजनांची विजबिले अदा करता येणार आहे. सध्यास्थितीत पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून गावातील पथदिव्यांची आणि बंधित अनुदानातून नळ पाणी पुरवठा योजनांची विजबिले अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही दोन्ही विजबिले अदा करताना फक्त सध्या दोन्ही समस्यांनाच प्राधान्य द्यायचे आहे. इतर खर्च नंतर करायचा असल्याचे निर्देश दिले आहे. तसेच भविष्यातील विजबिलाची रक्कम कमी करण्यासाठी सौर उर्जेवर भर देऊन वापर करण्यास प्राधान्य देण्यास सुचविण्यात आले आहे.

सध्या राज्या कोरोनाची परिस्थिती बघता ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा विजेअभावी उपकरणांचा वापर करू शकत नाही. तसेच पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनांची विजबिले अदा न केल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती अधिक बिकट होवू नये याकरिता पंधराव्या वित्त आयोगातून देयके अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामूळे आता गावातील पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनांचा विदयुत पुरवठा खंडीत होण्यास ब्रेक लागणार आहे.