चंद्रपूर : शहरी भागासह विधानसभा क्षेत्रात येणा-या ग्रामीण भागांचाही विकास झाला पाहिजे ही आपली भुमीका असून त्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. मागील दोन वर्षात ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करुन देता आला याचेही मला समाधान आहे. मात्र या भागांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी गाव तिथं सभागृह ही संकल्पना मि राबविणार असून प्रत्येक गावात सामाजिक, सांस्कृतीक व शुभ कार्यांसाठी स्वतंत्र सभागृह उभारण्याचा माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांमूळे शेणगांव येथील विकासासाठी ग्राम विकास निधी अंतर्गत ७५ लक्ष रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. आज शुक्रवारी या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शेणगांवच्या सरपंच पूष्पा मालेकर, उपसरपंच रमेश खवसे, दाताळा सरपंच रविंद्र लोणगाडगे, वढा सरपंच किशोर वरारकर, धानोरा सरपंच नंदकिशोर वासाडे, राकेश पिंपळकर, प्रभाकर धांडे, विजय मत्ते, राहुल जेनेकर, विकास तिखट, गणपत कुडे, जंगलू पाचभाई, पंकज गुप्ता, मुन्ना जोगी, रुपेश झाडे, राशिद हुसेन, धनराज हनुमंते, धनंजय ठाकरे, प्रेम गंगाधरे, चंद्रकांत वैद्य, शंकरराव वरारकर, भास्कर नागरकर आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, सभागृहाअभावी छोट्या – मोठ्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामूळे प्रत्येक गावाकडे त्यांच्या हक्काचे स्वतंत्र सभागृह असणे गरजेचे आहे. यातूनच गावं तिथं सभागृह ही संकल्पना मी वास्तविकतेत उतरविण्याचा संकल्प केला असून त्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. शेणगांवच्या विकासासाठी मोठा निधी मला उपलब्घ करुन देता आला आहे. या निधीतून होणा-या विकास कामांचे भूमिपूजन आज संपन्न होत असतांना गावातील आणखी काही नविन कामांचे निवेदन मला प्राप्त झाले आहे. ते पूर्ण करण्यासाठीही माझे प्रयत्न असणार आहे. लोकांना हवे ते काम करण्याची आमची भुमीका असून निश्चीतच गावातील इतर प्रलंबीत कामेही मार्गी लागतील असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखविला.
शेणगावच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असून आदिवासी समाजाच्या स्मारकासाठीही आपण तात्काळ ४ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे ते यावेळी म्हणाले, तसेच मागील आठवड्यात ग्रामीण भागातील अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच ते कामे पूर्ण होतील असेही ते यावेळी बोललेत, शेणगांव येथे पाण्याची मोठी समस्या आहे. ती सुटावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून त्या दिशेने शासनाकडे सातत्याने पाठपूरावा सुरु आहे. इरई नदीचा पाणी प्रवाह वळल्याने या गावात पाणी समस्या निर्माण झाली होती. येथील नागरिकांच्या सहकार्याने आपण पून्हा येथील पाणी पूरवठा सुरळीत करु शकलो. मात्र येथील पाणी प्रश्न कायमचा सुटावा याकरीता काही मोठ्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी येत्या काळात आपण या भागांमध्ये मोठे आरोग्य शिबीर आयोजित करणार असून शेणगांव ग्राम पंचायतीनेही यात सहभाग घ्यावा असे आवाहण त्यांनी यावेळी बोलतांना केले. कोरोनाची दुसरी लाट ओसडली असली तरी संभावीत तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामूळे त्या दिशेनेही गावाने पूर्व तयारी करावी. यात लागणारी मदत मि करायला तयार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच गावात स्वच्छता ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी निधी लागत असल्याच तो उपलब्ध करुन देण्याचे अश्वासन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामस्थांना दिले.
ग्रामविकास निधीतून मंजूर झालेल्या शेणगांव फाट्यावरिल स्वागत द्वारासह शेणगांव येथील पाच सिमेंट काँक्रिट रोडच्या कामांचे भुमिपूजन यावेळी संपन्न झाले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.