भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षावर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा नोंदवावा

0
327
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस (चंद्रपूर) : विधानपरिषदेची पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवळणूक येत्या 01 डिसेंबर रोजी होत असून निवङणुकीचे आचारसंहिता लागू झालेली आहे. याकरीता निवळणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वच राजकिय पक्षांनी आपले होर्डिंग व बॅनर काढले व आचारसंहितेची अंमलबजावणी केली.
मात्र भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा 21 नोव्हेंबर रोजी असलेल्या वाढदिवसा करिता संपूर्ण घुग्घुस शहरात मोठं – मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले यामध्ये भाजप जिल्हाध्यक्षा सह माजी मंत्री यांचे छायाचित्र असून यामध्ये रक्तदान कार्यक्रमा करीता येणाऱ्याना हेल्मेट तथा कूल वॉटर जार भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे आवाहन केलेले आहे.
निवङणूक काळात तसेच आचारसंहितेमध्ये अश्या स्वरूपाचे प्रलोभन नागरिकांना अथवा मतदारांना जाहीररीत्या देणे हे आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन असल्याचा आरोप करीत आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता यासंदर्भातील लेखी तक्रार आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांनी निवङणूक अधिकाऱ्यांना दिले व कारवाईची मागणी केली आहे.

विषेश म्हणजे देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे अश्यावेळी नागरिकांच्या जीवरक्षणा साठी राजकीय पक्षांनी सजग राहायला हवे मात्र 21 नोव्हेंबर रोजी गांधी चौक घुग्घुस येथे कुठल्याही प्रकारे कोरोना महामारी पासून बचावासाठी उपाय योजना राबविण्यात आली नाही.
सामाजिक अंतर, मास्क, सॅनीटाईजर याचा वापर करण्यात आला नाही तर रक्तदनाच्या नावावर 21 किलो केक युक्त आतिषबाजी सह जंगी वाढदिवस पार्टी साजरी करण्यात आली आहे. असा आरोप काँग्रेस नेते राजु रेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केला आहे.