मुंबई : येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे प्रदेश कार्यलयातील राजीव गांधी भवनात नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर ग्रामीण व शहर काँग्रेसची बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी वरोरा – भद्रावती क्षेत्राचे आमदार सौ.प्रतिभाताई सुरेश धानोरकर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू (रितेश) तिवारी,चित्रा डांगे (महिला जिल्हाध्यक्ष)सौ.सुनीता लोढिया सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमेटी, दिनेश चोखारे (कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती)ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, नंदू नागरकर (माजी शहर जिल्हाध्यक्ष) रोशन पचारे(जिल्हाध्यक्ष किसान सेल ) पवन आगदारी (जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग) व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी मागील तीन वर्षात अध्यक्षपद मिळाल्यानंतर पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची प्रदेश अध्यक्ष यांना माहिती दिली व लवकरच होऊ घातलेल्या घुग्घुस नगरपरिषदच्या निवडणूकीची पक्षातर्फे करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली.
किसान सेलचे अध्यक्ष रोशन पचारे व अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी ही आपली भूमिका ठेवली,