वणीत एक दिवसाचा व्यापारी असोसिएशनचा भारत व्यापार बंद

0
268

वणी : कॅट द्वारा आयोजित आज दिनांक 26 फेब्रुवारी 2021 ला भारत व्यापार बंद चे आयोजनार्थ वणी व्यापारी असोसिएशन द्वारे मा उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांच्या मार्फत मा पंतप्रधान भारत सरकार याना देण्यात आले आहे. व्यापार किंवा व्यापारी हे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

त्यामुळे व्यापाऱ्यांना सुविधा देने हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या कर्तव्याचे स्मरण व्हावे म्हणून कॅटने भारत बंद चे आयोजन केले आहे. त्या अयोजनाला वणी व्यापारी असोसिएशनचे समर्थन आहे त्यामुळे एक दिवसाचा व्यापारी असोसिएशनने बंद पुकारला आहे. तेव्हा शासनाने गुड अँड सिंपल टॅक्स म्हणून जी एस टी कर प्रणाली आणली आहे परंतु या कर प्रणाली मुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे त्रासदायक झाले आहे त्यामुळे आता व्यापारी कारकून झाला आहे तेव्हा या कर प्रणाली मध्ये परिवर्तन करावे अशी मागणी कॅट ने निवेदनाद्वारे केली आहे.

कारण पारंपरिक बाजाराचे संवर्धन करण्यासाठी मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे जसे पार्किंग, प्रसाधन गृह, पेयजल,या बाबींची पूर्तता करण्यात यावी . तसेच जी एस टी कर प्रणालीचा स्वीकार करून व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा वणी व्यापारी असोसिएशनने निवेदनातून केली आहेत