परवानगी रद्द करिता नागरिकांचे स्वाक्षरी युक्त निवेदन
चंद्रपूर : महाविकास आघाडी शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने दारू विक्रते पडीत असलेल्या दारू दुकान बार आदींची साफ़सफाई, डागडुजी, व परवाना नूतनीकरणाच्या कामाला लागले असतांना घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या ड्रीम लँड सिटी वॉर्ड क्रमांक सहा येथील ‘दादा’ बार विरोधात वॉर्डातील नागरिकांनी पवित्रा घेतला असून हे बार शुरू होऊ नये याकरीता सामूहिक स्वाक्षरीचे निवेदन पालकमंत्री, नगरपरिषद घुग्घुस, जिल्हाधिकारी, आबकारी विभाग,पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले.
हा परिसर नागरिकांचा गजबजलेला परिसर असून या परिसरात प्रियदर्शनी कन्या शाळा तसेच मंदिर असल्याने या बारला परवानगी देण्यात येऊ नये अशी नागरिकांनी निवेदनातुन केली आहे.