जागतीक अंमली विरोधी दिनानिमीत्त शासनाला पुरस्कार्थीचा गर्भीत इशारा
चंद्रपूर : वर्धा, गडचिरोली, बंदी आहे व चंद्रपुरची दारु बंदी नुकतीच मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अट्टाहासापायी उठविण्यात आली आहे. शासनाच्या ‘व्यसनवर्धक’ नीतीच्या महाविकास आघाडी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात शासनाचे राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार परत करणे बाबतचे आवाहन व्यसन मुक्त महाराष्र्ट समन्वय मंचाचे वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला उस्फृर्त प्रतिसाद राज्यभरातील व्यसन मुक्ति पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांनी दिला आहे. “पुरोगामी महाराष्र्टात प्रतिगामी निर्णय,दारु बंदी व्यसन मुक्तिसाठी आम्ही निर्भय” असे राज्यव्यापी अभियानही मंचाचे वतीने राबविण्यात आले.त्या अभियान समारोप प्रसंगी शासनाला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व त्याकरीता जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिवस निवड करण्यात आला आहे.
26 जून ला राजर्षी शाहू महाराज जयंती ,सामाजिक न्याय दिवस व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवशी आपआपल्या जिल्हातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना ते पुरस्कार परतीचे पत्र देवून सुचित करणार आहेत. 26 जून रोजी चौथा शनिवार निमीत्त सुट्टी असल्याने पुरस्कार परतीचा गर्भीत इशारा 28 तारखेला देण्यात येणार आहे. व पुढील एक महीण्यात राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा अशी विनंतीही ते या पत्रात शासनाला करणार आहे. व शासनानी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी संदर्भात पुनर्विचार करावा अन्यथा ९आगष्ट क्रांतीदानी शासनाला पुरस्कार परत करण्याचा गर्भीत इशारा शासनाला देणार आहे.
राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती कार्यकर्त्ता पुरस्कार परत करणा-या मान्यवरांची नावे.पुढील प्रमाणे
१)मा.डाँ.अजित मगदुम, नवी मुंबई
२)मा.हरीश्चंद्र कृष्णाजी पाल,चंद्रपुर
३)मा.डाँ.सुर्यप्रकाश गभणे,
आरोग्य प्रबोधीनी सामाजिक संस्था,वडसा देसाईगंज, गडचिरोली.
४)मा.विरेंद्र मेश्राम, मुल चंद्रपुर
५)मा.तुषार खोरगडे,गडचिरोली
६)मा.विजय धर्माऴे,अमरावती
७)मा.जयकृष्ण खडसे,अमरावती
८)मा.देशपांडे महाराजबुलढाणा
९)चंद्रबोधी घायवते ,यवतमाऴ
१०)मा.गणेश वानखेडे,बुलढाणा
११)मा.अवधुत वानखेडे, बुलढाणा
१२)मा.पुष्पावती पाटील,नाशिक
१३)मा.सुचेता पाटेकर परभणी
१४)मा.अर्पिता मुंबरकर, सिंधुदुर्ग
१५)झुंबरराव खराडे, पुणे
एकीकडे महाराष्ट्र शासनाकडून राज्यात व्यसनमुक्ती कार्य करणार्या व्यक्तीला सन्मानित करून व्यसन मुक्ती कार्याकरीता प्रोत्साहित करते. तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेवून खूलेआम दारू पिण्यास जनतेला प्रोत्साहन देते आहे. हे शासनाचे कार्य परस्पर विरोधी तसेच जनहीत विरोधी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच राज्यातील व्यसनमुक्ती कार्यकर्त्ता पुरस्कार मिळालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसाठी विविध आंदोलन करणाऱ्या महीलांचा घोर अपमान आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा जाहीर निषेध करण्याचा निर्णय अनेक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. चंद्रपुर जिल्हा दारु बंदी पुन्हा लागु करण्यात यावी. तसेच दारुबंदीची योग्य व प्रभावी अंमलबजावणी करावी आणि वर्धा व गडचिरोली जिल्हातील दारु बंदी उठविण्याच्या हालचाली त्वरीत बंद कराव्यात असे आवाहन या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केलेली आहे. आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून मिऴालेला “राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती कार्यकर्ता पुरस्कार ” सरकारला परत करीत आहोत असे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, व तहसिलदार यांना देणार आहे.
महाराष्ट्रातील इतरही पुरस्कार प्राप्त व्यक्तीनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
डॉ अजित मगदूम (मुंबई), हरीश्चंद्र पाल (चंद्रपुर), राज्य सरचिटणीस (नशाबंदी मंडळ महा. राज्य)
वर्षा विदया विलास, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती अविनाश पाटील यांनी केले आहे.