घुग्घुस : रविवार 25 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान घुग्घुस नपचे कर्मचारी सुरज जंगम व गौतम देशकर सोबत मिळून घुग्घुस नप कार्यालया समोरील आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने बंद करण्यासाठी गेले असता जतीन राऊत व ललित राऊत रा. घुग्घुस यांनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली.
त्यामुळे घुग्घुस नपच्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांनी तक्रार देण्यासाठी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठले परंतु आपसी समझोत्याने त्यांनी तक्रार परत घेतली.
सध्या कोरोना मुळे घुग्घुस नपने दुकाने सुरु ठेवण्याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंत ठेवली आहे. परंतु रविवार दिवस असल्याने नागरिक भाजीपाला खरेदी साठी आठवडी बाजारात जातात ग्राहकांची गर्दी बघून विक्रेते आपली दुकाने दुपारी 4 वाजता नंतरही सुरूच ठेवतात.
जतीन राऊत व ललित राऊत यांचे आई वडील आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करतात तिथे घुग्घुस नपचे कर्मचारी सुरज जंगम व गौतम देशकर दुकान बंद करण्यासाठी गेले असता त्यांनी बाचाबाची सुरु केली व त्यांच्यावर हल्ला करीत मारहाण केली.
जतीन राऊत हा गुंडप्रवृत्तीचा असून त्याच्यावर अवैध दारू तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. घुग्घुस नपचे कर्मचारी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले असता जतीन राऊतच्या साथीदारांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती. घुग्घुस नपच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचे बोलले जात आहे.