निर्दयी मनुष्याचे क्रूर कृत्य; गाईचे दोन्ही पाय तोडले

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील रामपूर येथील हरीचंद्र जीवतोडे यांच्या गाईला झाडाला बांधून समोरील दोन्ही पाय अज्ञात इसमांनी तोडल्याची घटना आज (२५) उघडकीस आली.

रामपूर येथील मोलमजुरी करून आणि दुधाचा व्यवसाय करणारे हरीचंद्र जीवतोडे यांच्या गाभन गाईला जंगलात नेऊन झाडाला बांधून गाईचे समोरील दोन्ही पाय तोडून तडफडत असलेल्या गाईला सोडून दिले. ही क्रुर घटना आज सायंकाळी उघडकीला आली. सदर घटनेची माहिती पोलीस उप निरीक्षक साखरे यांना दिली असता पोलिसांनी मौका चौकशी व पंचनामा करून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

अशा क्रुर घटनेमुळे हरीष्चंद्र जिवतोडे यांचे मोठे नुकसान झाले असून त्या माथेफिरूला अटक करून कडक कारवाई करावी व गाय मालकाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी रामपूर घ्या सरपंच सौ वंदनाताई गौरकर यांनी केली आहे.