घुग्घुस काँग्रेसने सैनिकां प्रति व्यक्त केले आभार
घुग्घुस : 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला धूळ चारली होती.
ऐकून 60 दिवस चाललेल्या या युद्धात अठरा हजार फीटच्या उंचीवर लढल्या गेलेल्या या युद्धात जवळपास तीन हजार पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडुन हे युद्ध जिकण्यात आले होते.
आज कारगिल विजय दिनी सैनिकां प्रती आभार व्यक्त करण्याकरिता घुग्घुस शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे माजी सैनिक संदीप मारोती टिपले यांनी सतरा वर्ष देशसेवा केली असून 220 शव एकट्याने जाळली व 120 नागरिकांचे रेस्क्यू केले जम्मू काश्मीर, भुज अश्या विविध ठिकाणी सेवा दिली, विनोद डेरकर रा.उसगाव यांनी 17 वर्ष सेवा दिली , कमल सिंह यांनी वीस वर्षे देशसेवा केली या सैनिकांचे पुष्कहार घालून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सन्मानाने माजी सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले याप्रसंगी उपस्थित युवकांना त्यांनी आपल्या सेवेतील अनुभव व्यक्त केले याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,बालकिशन कुळसंगे,सचिन कोंडावार,राकेश खोब्रागडे, विशाल मादर,इर्शाद कुरेशी, नुरुल सिद्दीकी, रोशन दंगलवार, रियाज शेख, आरिफ शेख,सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.