सोळा वर्षीय युवतीने आजोबाच्या घरीच पाळण्याच्या दोरीने घेतला गळफास

चंद्रपूर : घरचे कुटुंबीय शेतात कामाला गेल्यानंतर एका सोळा वर्षीय युवतीने आजोबाच्या घरी पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रविवारी (27 जून) ला घडली. दिपाली बापूजी मरापे (वय 16) असे मृत युवतीचे नाव असून ती राजुरा तालुक्यातील टेंम्बूरवाही येथील रहिवासी होती.

आज दुपारी एक-दोन वाजताच्या सुमारास दिपाली बापूजी मरापे हिनेआजोबा उद्धव लचमा कुड़संगे यांचे घरी पोर्च मध्ये पाळण्याच्या दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली.

मृतकाचे सर्व परिवार शेत कामा करिता शेतात गेले होते. गावकऱ्याना प्रेत दिसताच त्यांनी त्याच्या परिवाराला कळविले असता त्यांनी घरी येऊन पोलीस पाटीलास सांगितल विरुर पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता लगेच विरुर पुलिस स्टेशन ठाणेदार श्रीकृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात मौका पंचनाम्या करिता पो.हवा वागदरकर, मपोशी सौजण्या, पोशी मडावी, सैनिक धनपालसिंग वाधावन पोहचून पंचनामा करण्यात आलला.