वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला राजीनामा?

0
275

मुंबई : संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी राठोड पत्नीसह वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शिवसेनेचे बडे नेते उपस्थित आहेत.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी होती. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

त्तपूर्वी पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल येईपर्यंत संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेऊ नका, अशी विनंती राज्य सरकारला केली आहे.