घुग्घुस नगरपरिषदचे आरोग्य मुकुडदम सुपरवायझरने गळफास घेत केली आत्महत्या

0
98

घुग्घुस : शहरातील अमराई वार्ड मध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय पुरुषाने घरात गळफास घेत आत्महत्या केली.
ही धक्कादायक घटना आज रविवारी दुपारी एक वाजेदरम्यान उघडकीस आली असून मृतकाचे नाव मोहन प्रमोद गुंदे आहे.

मृतक मोहन हा घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात आरोग्य मुकुडदम सुपरवायझर या पदावर काम करीत होता.
अमराई वार्डात मोहन हा भाड्याने राहत असून आज त्याने सकाळपासून घराचे दार उघडले नव्हते, मृतकांची बहीण जेव्हा घरी आली तर त्यांनी खिडकीतून बघितले असता मोहन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, मृतक मोहन च्या गळ्यातून रक्तस्राव होत होता. आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे, पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here