लॉयड मेटल्स कामगारांनी केले टूल डाऊन आंदोलन

0
341
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस येथील लॉयड मेंटल्स येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी सकाळी सहा वाजेपासून ठेकेदारी तसेच परमनंट कामगारांनी टूल डाऊन आंदोलन सुरु केले आहे. मागील अनेक महिन्यांपासून कामगारांच्या अनेक मागण्या मॅनेजमेंटने मान्य केल्या नव्हत्या त्यामध्ये अनेक महिन्यापासून चालढकल करण्यात येत होती.

या मागण्या मध्ये प्रमुख्याने मागील वेतन कराररा नुसार कामगारांना देण्यात येणारा मागील वर्षी ची थकबाकी तसेच मागील वर्षाचे पेंडिंग वेतन वाढ देण्यात येणार होती ती सुद्धा देण्यात आलेली नाही. मागील एक वर्षापासून लॉयड मेटल्स मॅनेजमेंटने चंद्रपूर येथून येणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता तसेच लॉयड मेटल कॉलनी येथून येणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता असलेली बसची सुद्धा सेवा मॅनेजमेंट बंद केली होती.

ती सुविधा सुद्धा चालू करावी या प्रमुख तीन मागण्या तसेच इतर अनेक पेंडिंग करता हे आंदोलन करण्यात आलेले आहे.

रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू असून मॅनेजमेंट ने अजून पर्यंत त्यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही त्यामुळे हे आंदोलन असेच बेमुदत सुरू राहील असे कामगारांचे म्हणणे आहे. सकाळी सहा वाजेपासून कामगारांनी एकत्र येऊन लॉयड मेटल्स ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग समोर धरणे दिले आणि संपूर्णपणे काम बंद केलेले दिसून येत आहे त्यामुळे लॉयड मेटल्स चे रोज करोडचे नुकसान होत आहे.