दिव्यांग बांधवासांठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तयार करा – आ. किशोर जोरगेवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा करत केल्या सुचना

चंद्रपूर : कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय आहे. त्यामूळे समाजातील सर्व घटकांना कोणत्याही अडचणी शिवाय लसीकरण करता यावे या दिशेने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहे.

कोरोनाची संभावित तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आज पासून निर्बंध कडक केले आहे. याच पाश्र्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली असून अनेक सुचना केल्या आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेत मुबलक संसाधनांअभावी चंद्रपूरकरांना मोठी किंमत चुकवाली लागली आहे. त्यामूळे तिसरी लाट येण्याआधिच योग्य उपायोजना करण्याच्या दिशेने प्रशासनाने उपाययोजना करायला सुरवात केली आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे. यावेळी लसीकरणावर जोर देत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याच्या सुचना केल्या आहे. लसीकरण मोहिमेत दिव्यांग बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी विषेश प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. तसेच दिव्यांग बांधवांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसिकरण केंद्र तयार करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे. या लसीकरण केंद्राबाबत व येथील लसींच्या साठ्याबाबतची माहिती दिव्यांग बांधवांना मिळत राहावी अशी यंत्रणाही सुसज्ज करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.