धीडसी येथे २९ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

राजुरा : तालुक्या अंतर्गत येत असलेल्या धिडसी येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल सपाट यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कोरोनाच्या या कठीण काळामध्ये रक्ताची निर्माण झालेली टंचाई व शासनाने रक्तदान करण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत (दि. २७) २९ युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान व वृक्षारोपनाम केले.

कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते झाले यावेळी अध्यक्ष माजी आमदार ऍड.संजय धोटे, प्रमुख पाहुणे भाजपा तालुका अध्यक्ष व जि.प.चे कृषी पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, सरपंच रिता हणमंते, उपसरपंच राहुल सपाट, भाजपा जिल्हा सचिव व खमोना ग्रा.पं.चे सरपंच हरिदास झाडे, भाजयुमो चे तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, भाजप चे कार्यकर्ते नितीन बाब्रटकर, माजी सरपंच मधुकर पा. काळे, डॉ. नारायण काकडे, सृष्टी बहुउद्देशीय संस्थेचे संचालक अनिल पोडे, गौरीहर टोंगे, मारडा चे पो. पा. सतीश भोयर, ग्रा.पं.धिडसी चे सदस्य संतोष काकडे विनोद कोरडे उपस्थितीत होते.

छोट्याशा गावात रक्तदान करण्याचा उत्साह आणि रक्तदान शिबिरात सहभाग पाहता येथील युवकांनी इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. याचबरोबर धीडसी या गावात 45 वर्ष वयोगटाच्या वरील नागरिकांचे 100% लसीकरण करीत जिल्ह्यातुन प्रथम शंभर टक्के लसीकरण करण्याचा मान मिळविला आहे. येथील युवकांमध्ये सामाजिक कार्याबद्दल असलेली तळमळ पाहता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी गावातील युवक व इतर नागरिकांना शुभेच्छा देत गावात होत असलेल्या विकास कामाबद्दल शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका वरघणे मॅडम यांनी केले. यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.