चक्क गृहमंत्र्यांच्या नांवाने हिंगणघाट येथील दारू तस्कर चंद्रपूर ,गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या करतो दारू तस्करी

0
301

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भिवापुर कार्याध्यक्ष यांची गृहमंत्री कडे तक्रार ; तक्रारीचे पत्र सोसिल मीडियावर वायरल

चंद्रपूर : दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवी नवलखेडे रा. हिंगणघाट, जिल्हा- वर्धा नामक व्यक्ती मागिल अनेक महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात बेकायदेशिररीत्या दारु पुरवठा करीत आहे, चंद्रपूर जिल्हा एस. पी. कार्यालयापासुन तर डि. वाय. एस. पी. कार्यालय व सर्वच पोलीस स्टेशन मधील अधिका-यांशी त्याचे साटेलोटे असल्याने नवलखेडे याचा दारुचा अवैध व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे. अशी तक्रार खुद्द मा. ना. श्री. अनिलजी देशमुख यांचे कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल मैदिले कार्याध्यक्ष – भिवापूर शहर, जिल्हा नागपूर यांनी लेटरपडवर केली असून ते पत्र चंद्रपूर जिल्ह्यात विविध सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या तक्रारारीत म्हटले आहे की नागपूर जिल्हातील उमरेड, बुटेबोरी, व अन्य काही शहरांतील दारू दुकानांमधुन दारुची उचल करुन ती चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुके व गावांत पोहचविल्या जाते. यातुन दररोज करोडो रुपयांची उलाढाल होत असते. हे पोलीस अधिका-यांच्या आशिर्वादाने अवी नवलखेडे याचा दारुचा कारभार प्रचंड प्रमाणात फोफावला आहे.दारु व्यवसायात कुठल्याही अडचणी येवु नये यासाठी नवलखेडे हा मा. गृहमंत्री यांच्या नावाचा सरांस वापर करतो. मा. गृहमंत्री कार्यालयाशी माझी सेटिंग आल्याचे तो नेहमीच ईतरांना सांगत असतो. यातुन मा,गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी बदनामी होत आहे. अवी नवलखेडे हा मुळातच अपराधथी प्रवुत्तीचा असुन त्याच्या विरोधात वर्धा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात अनेक गुन्हयांची नोंद आहे. अशा या गुन्हेगारी प्रवृत्तिच्या व्यक्तिचा चंद्रपूर जिल्ह्यात दारु पुरवठ्याचा सुरू असलेला कारोबार लवकरात लवकर बंद करून त्याला बेड्या ठोकण्यात याव्यात, याकामात त्याला सहकार्य करणा-या पोलीस विभागातील अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी या पत्रात केली आहे.

अवैधरित्या दारू तस्करीच्या प्रकरणी चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यावेळी मोठीं अवैधरित्या दारू भरलेली आलिशान चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून चिमूर तालुक्यातील अनेक गांवात अवि नवलखेडे अवैधरित्या दारू पुरवठा करतो हे या घटनेने दिसून आले आहे .