चंद्रपूर : घुग्घुस एमआयडीसी परिसरात लॉयडस मेटल अँड एनर्जी या कच्च्या लोखंडाचा कारखाना आहे.त्या कारखान्याचे विस्तारीकरण करून कच्च्या मालाचे रूपांतर पक्या मालात उत्पादन करण्याचा प्रकल्प उभारणार आहे.25 वर्षा पासून कार्यरत कारखान्या पासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊन विविध आजार जळले, पशु व जनावरांच्या जीवना बरोबरच या क्षेत्रातील शेत जमिनिवर या प्रदूषनाचे परिणाम होऊन उत्पादन क्षमतेत घट झाली आहे.
लॉयडस मेटल्स कारखान्याच्या मालकांनी पक्या मालाच्या निर्मिती साठी कारखान्याच्या विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात बुधवारला कारखान्याच्या आत 50 लोकात जनसुनावणी होणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.या जनसुनावणी बाबत व्यवस्थापनानी अतिशय गुप्तता बाळगली असून आज सकाळी जनसुनावणीचा विषय बाहेर येताच गावात व परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या संदर्भात विविध वृत्तपत्राच्या प्रतिनिधीचे भ्रमणसेवे वरून पर्सनल मॅनेजर यांचे व वरीष्ठ अधिकाऱ्या कडून संपर्क केला मात्र दखल घेतली नाही.760 कोटीच्या नवीन प्रस्तावित प्रकल्पा संदर्भात जनसुनावणी बाबत अतिशय गुप्तता व्यवस्थापना कडून बाळगण्यात आली.
बुधवारला सुनावणी असली तरी ती कुठे केव्हा ठेवण्यात आली व वेळ काय आहे या बाबत घुग्गूस नगर परिषद तसेच नजीकच्या कोणत्याही ग्राम पंचायतला या जनसुनावणी प्रकरणी कसल्याही प्रकारच्या सुचना किंवा वर्तमान पत्रात प्रसिद्धी दिली नसल्याची नागरिकात चर्चा आहे.तर काही राजकीय नेत्यांनी मात्र व्यवस्थापनाला सहकार्य करीत असल्याचे बोलले जात आहे.
विद्यमान लॉयडस मेटल्स एन्ड एनर्जी लि. या कारखान्याचे स्पंज आर्यनचे 500 क्षमता असलेला एक तर 100 क्षमताचे 4 युनिट सुरू असून वीज प्रकल्पातून 25 मे.वा. वीज निर्मिती होत असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.
त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे जन्मजात मुले ही आजार घेऊन जन्माला येत आहे.विविध आजार लोकांना जळले आहे. कृषि मालाचे उत्पादनावर परिणाम होत आहे.
प्रदूर्षण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेले नियमाचे उलघन केल्याने वेळोवेळी अनामत रक्कम ही प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोठविली आहे तरी कारखान्याला 25 वर्ष होऊन व्यवस्थापना कडून नियमाचे पालन केले जात नाही असा आरोप विचारवंत बुद्धिजीवी नागरिकां कडून होत आहे.विश्वसनिय सूत्राच्या माहिती नुसार सदर सुनावणी एप्रिल महिन्यात नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात होणार होती मात्र कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती अशी माहिती आहे.
760 करोड लागत असलेल्या प्रकल्पाचे विस्तारीकरणा बाबत सुनावणी होत असली तरी घुग्घुस नगर परिषद सुद्धा अनभिज्ञ आहे. कोट्यावढीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे मात्र जनसुनावणी बाबत इतकी गुप्तता का बाळगण्यात येत आहे हा सद्या चर्चेचा विषय बनला असून बुधवारला जनसुनावणीचा विरोध करून जनसुनावणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होणार आहे. या क्षेत्रातील लोक प्रतिनिधी,प्रदूषणा बाबत नेहमी तक्रारी करून वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी धावपळ करणाऱ्या विविध राजकीय व समाजसेवक काय भूमिका घेणार याकडे बुद्धिजीवी लोकांचे लक्ष लागले आहे.