स्थानिक चालक – मालका तर्फे काँग्रेस नेत्यांचा सत्कार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गुप्ता वॉशरीज येथे चालक – मालकांना मिळाला रोजगार

घुग्घुस : परिसरातील उसगाव येथील महामीनरल माइनिंग & बेनिफिकेशन प्रा.लि.(गुप्ता वॉशरीज) येथे स्थानिक सिंगल चालक यांचा वॉशरीज मध्ये मोठ्या ट्रान्स्पोर्टर तर्फे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करण्यात येत होता.

घुग्घुस येथील काही राजकीय पक्ष ही ट्रान्स्पोर्टर बनून स्थानिकांचा शोषण करीत असल्याची तक्रार स्थानिक चालक – मालक यांनी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्याकडे केली असता पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार व खासदार बाळु धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली 13 जून रोजी वॉशरीज मेनगेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाला यश प्राप्त होवून आधी स्थानिक चालकांना 95 रुपये प्रति टन मिळत होते आता काँग्रेस आंदोलना नंतर वीस रुपयांची वाढ होवून 115 रुपये देण्यात येईल व असा करार दिनांक वॉशरीज व चालक व मालक यांच्यात करार झाला याचा आनंद व्यक्त करण्या करीता स्थानिक चालक – मालक यांनी आतिषबाजी करून पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राकेश खोब्रागडे, श्रीनिवास गोस्कुला,रियाज शेख, अब्राहम कुरविला, अशोक जैन,इर्शाद शेख,हाशीम शेख, श्याम आरकीला, रोहित जैस्वाल, अंगद गिराम,बाळु राऊत,प्रकाश सिंग, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.