एक महिन्यात 300 वेळा बंद होतो राजुरा चे रेल्वे गेट

0
227
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आज दूपारी फक्त एक इंजिन करिता बंद होता एक तासात शेकडो गाड्या जमल्या

राजुरा : येथील शिवाजी कॉलेज जवळ असलेले सिमेंट कंपन्यांना कच्चा माल वाहतूक करणारे रेल्वे मुळे दररोज दहा वेळा गेट बंद केले जाते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

एक महिन्यात तीनशे वेळा गेट बंद होते या भागात शाळा महाविद्यालयात चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे बस डेपो आहे तेलंगणा कडे जाणारा मुख्य मार्ग आहे त्यामुळे गेट वर मोठी गर्दी होते मागील अनेक वर्षांपासून अंडर पास ची मागणी आहे माजी खासदार हंसराज अहिर यांनी मजूर केले होते परंतु मागील वीस वर्षांपासून हा रेल्वे गेट नागरिकांना त्रास देत आहे. सुबाभूळ भरलेल्या ट्रुक या गेट वरून जाताना अडकून लाकडे खाली पडतात या मुळे कुणाला गंभीर दुखापत होऊ शकते यासाठी वेळेच्या आत दाखल घेणे आवश्यक आहे. राजुरा रेल्वे गेटवर ओव्हर ब्रीज बनवा अशी मागणी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधीनि केले आहे.