लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विस्तारित प्रकल्पाची लोकसुनावणीत नागरिकांचा संताप

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कंपनीची बाजू घेणाऱ्या नेत्यांची नागरिकांनी उडविली खिल्ली

चंद्रपूर : घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रातील प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात वादग्रस्त लोयडस मेटल्स कंपनीच्या विस्तारीकरणा साठी आज बुधवार 30 जून रोजी सकाळी 10:30 वाजता दरम्यान प्रकल्प स्थळावर पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय चंद्रपूरच्या वतीने ठेवण्यात आली होती.

कोरोना महामारी मुळे मोजक्याच पन्नास नागरिकांना बोलाविण्यात आले होते. लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस याच्या प्रस्तावित इंडक्शन फरनेस, रोलिंग मिल व सबमज्ड॔ आर्क फरनेसची उभारणी करून इनगॉट्स व बिलेट्स 5,00,000 टन प्रतिवर्ष टीएमटी व लॉग प्राडक्ट 5,00,000 टन प्रतिवर्ष क्षमतेच्या संयत्राच्या फेरो अलॉयज 2500 टीपिए उभारणी बाबतच्या प्रस्तावाबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी ठेवण्यात आली होती.

हा प्रकल्प 760 करोडचा आहे यात 750 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले या विस्तारित प्रकल्पा साठी घुग्घुस, उसगाव परिसरातील शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत.
सुनावणीत सर्व पक्षीय नेत्यांसह शेजारील महिला व नागरिक उपस्थित होते

सुनावणी दरम्यान नवीन प्रस्तावित प्रकल्पास 80% नागरिकांनी विरोध दर्शवीला तर काही राजकिय नेते ज्यांचे कंपनीत अनेक वर्षांपासून ठेके शुरू आहे त्यांनी कंपनीचे समर्थन केले.असता नागरिकांनी हुटिंग करून त्यांची खिल्ली उडवली

या जनसुनावणीत चंद्रपूर अप्पर जिल्हादंडाधिकारी मनोहर गव्हाड, चंद्रपूर प्रभारी उप-प्रादेशिक म.प्र.नि. मंडळ उमाशंकर भादुले, चंद्रपूर सदस्य तथा प्रादेशिक अधिकारी म.प्र.नि. मंडळ अ.भा.करे, लॉयड मेटल्स अँड एनर्जीचे लिमिटेडचे प्रशांत पुरी, घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, मनसे अध्यक्ष राहुल बालमवर समाज सेवक रविश सिंह, अधिवक्ता श्रीकांत नुने, राकेश डिंगडला,कामगार नेते सैय्यद अनवर, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, नकोडा जि.प.सदस्य ब्रिजभूषण पाझरे, भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, घुग्घुस कामगार नेते लक्ष्मण सादलवार, नकोडा माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद, कामगार नेते अशपाक शेख, घुग्घुस बिएसपी अध्यक्ष मोहन येमूर्ले, सामाजिक कार्यकर्ते, रोहित घोरपडे,राहुल बल्लमवार, श्रीकांत नूने, बी.आर.एस.पी नेते सुरेश पाईकराव आदी उपस्थित होते.

लोयडस मेटल्स कंपनीच्या प्रदूषणाला घेऊन नागरिकांनी कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घुग्घुस पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता तसेच दंगा नियंत्रण पथकास बोलाविण्यात आले होते.