ट्रक चालकांचे आंदोलन सुरुच

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पल्ला गाडी चालक मालकांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट

चंद्रपूर : मागील चार दिवसांपासून विविध मागण्यांना घेवून स्थानिक ट्रक चालकांचे वेकोलि प्रशासनाच्या विरोधात घूग्घूस येथे आंदोलन सुरु आहे. दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी घुग्घुस वेकोलि कोळसा खाणीत पल्ला गाडी वाहनांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. याप्रसंगी रविश सिंह, सय्यद अब्रार, राहूल यादवंशी, हमीद शेख, सानू शेख, राकेश दिंडीगाला आदिंची उपस्थिती होती.

घुग्घुस शहरालगत अनेक कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणीत स्थानिकांचे अनेक वाहने चालतात. मात्र काही दिवसांपासून वेकोलिने पल्ला वाहनांना बंदी घातली आहे. तसेच टिप्पर वाहनांना परवानगी दिली होती. त्यामुळे स्थानिक ट्रक चालक मालकांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या विरोधात मागील चार दिवसांपासून स्थानिक ट्रक चालकांनी वेकोलि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहेे. दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. वेकोलीने अंतर्गत पाच ते सात किलोमीटरसाठी पल्लागाडी बंद केली आहे. त्यामूळे येथील जवळपास 400 ते 500 गाडी मालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. हे गाडी मालक रोजगार देण्याचे काम करतात त्यामूळे याचा प्रभाव स्वाभावीक अनेकांच्या रोजगारावर जाणवत आहे.

त्यामूळे पल्लागाडी चालक मालकांचे प्रश्न गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून पल्ला वाहनांना परवानगी देण्यात यावी, येथील २५ टक्के वाहने वेकोलीत लावून स्थानिकांना रोजगार द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे