घुग्घुस नगरपरिषद साठी आमदार किशोर जोरगेवार यांचा पाठपुरावा शुरूच

0
211
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घूस नगर परिषदेच्या निमीर्तीसाठी आ. किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे तळ ठोकले असून सातत्याने त्यांचा पाठपूरावा सुरु आहे. काल रात्री अशीरा या संदर्भातील फाईलवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाक्षरी केल्यानंतर नियमानूसार सर्व प्रक्रिया पुर्ण करुन सदर फाईलवर विधी – न्याय विभागने अभिप्राय नोंदवून फाईल पुन्हा ग्रामविकास विभागाकडे वळती केली आहे. आता औपचारिकता पूर्ण करुन अंतिम मंजूरीकरीता सदर फाईल नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या वेगवाण हालचारीमुळे घूग्घूस नगर परिषदेची प्रतिक्षा लवकरच संपण्याची आशा निर्माण झाली आहे.

घूग्घूस नगर परिषदेच्या निर्मीतीसाठी घूग्घूस येथील सर्व पक्ष एकजूट झाले आहे. यासाठी त्यांच्या वतीने आंदोलने सुरु असून ग्रामपंचयत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. शासनस्तरावर मध्यस्ती करण्याचा प्रयत्न होत असला तरी नेते आपल्या भुमीकेवर ठाम आहे. त्यातच आता आ. किशोर जोरगेवार यांच्या सातत्याच्या पाठपूराव्या नंतर घूग्घूस नगर परिषद निर्मीतीच्या हालचालींनाही वेग आले आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेही यासाठी आग्रही असून त्यांचाही पाठपूरावा सुरु आहे. दरम्याण काल रात्री उशीरा आ. जोरगेवार यांच्या प्रत्येक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर फाईलवर हस्ताक्षर केले. त्यानतंर फाईल ग्रामविकास विभागाकडून विधी – न्याय विभागाकडे पाठविण्यात आली. विधी व न्याय विभागाने फाईलवर योग्य कार्यवाही करत आपले अभिप्राय नोंदवून पून्हा ती फाईल ग्रामविकास विभागाकडे वळती केली. आता औपचारीकता पूर्ण करुन सदर फाईल ग्रामविकास विभाग अतिंम मान्यतेसाठी नगर विकास विभागाकडे पाठविणार आहे. येत्या एक ते दोन दिवसात हि प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. एंदरीतच घुग्घूस नगर परिषदेच्या निर्मीतीच्या कामासाठी मुंबई येथे जोरदार हालचारी सुरु आहे.

आ. किशोर जोरगेवार यांची घूग्घूस ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याची मागणी
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट, सकारात्मक चर्चा
घुग्घूस नगर परिषदेच्या निर्मीतीसाठी मुंबई येथे गतीशील हालचारी सुरु आहे. त्यामूळे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूका रद्द करण्यात यावा अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी आज मुबंई येथे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस मपान यांची भेट घेत केली आहे.
घूग्घूस नगर परिषदेची स्थापणा करण्यात यावी या करीता सर्व पक्षीय नेत्यांनी होऊ घातलेल्या घूग्घूस ग्रामपंचायतीच्या निवडणूकांवर बहिष्कार टाकला असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच या संदर्भातील फाईल अंतिम मंजूरीकरीता नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी आ. जोरगेवार यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस मपान यांना दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत प्रस्ताव प्राप्त होताच निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस मपान यांनी आ. किशोर जोरगेवार यांना दिले आहे.