चंद्रपूर : 24 मार्चला शहरातील पडोली चौकात ट्रकच्या धडकेत 45 वर्षीय भगवान माहुरकर यांचा मृत्यू झाला होता. मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या भगवानच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली होती. मृतक भगवानच्या मागे पत्नी 30 वर्षीय प्रीती माहुरकर, 9 वर्षाची मुलगी प्रीती व 8 वर्षाचा मुलगा रोहन यांच्या मदतीसाठी “नारी शक्ती” संघटनेने पुढाकार घेत माहुरकर परिवाराला ट्रक मालकांकडून आर्थिक मदत मिळवून दिली.
मात्र पुढे असलेल्या आयुष्यबाबत माहुरकर परिवारासमोर अनेक अडचणी उभ्या झाल्या मात्र नारी शक्ती संघटनेला नव्याने जुडलेल्या डॉ. शर्मीली पोद्दार यांनी आपला वाढदिवस गरजू कुटुंबाला मदत करीत साजरा करण्याचे ठरविले. 30 मार्चला नारी शक्ती संघटनेच्या पदाधिकारी यांनी माहुरकर परिवाराची भेट घेत त्यांना गृहपयोगी वस्तूंची व किराणा सामानाची भेट देत, दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेण्यात आली.
नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी माहुरकर कुटुंबाला पुढे सुद्धा मदत करण्याची तयारी दर्शविली. यावेळी नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष सुनीता गायकवाड, उपाध्यक्ष सायली येरने, डॉ. शर्मीली पोद्दार, प्रेमीला बावणे, पूजा शेरकी, अर्चना आमटे, माला पेंदांम व अनिता झाडे उपस्थित होते.