काँग्रेस तर्फे पूरग्रस्तांना जीवनाशयक साहित्याची मदद 

घुग्घुस : सततच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पुराचा फटका बसून जनजीवन विस्कळीत झालेले आहेत. पूरग्रस्त नागरिकांना फूल नाही फुलांची पाकळी या उद्देशाने प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले, पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या सूचनेनुसार घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे तांदूळ,कणिक, डाळ, तेल, साखर, पत्ती, टूथपेस्ट, टूथब्रश, मिर्ची, हळद, मीठ अशी स्वरूपाची किट पाठविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,प्रफुल हिकरे, विशाल मादर,नुरुल सिद्दिकी,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी, सचिन कोंडावार, बालकिशन कुळसंगे,रंजित राखुडे,संपत कोंकटी, सूनिल पाटील, नबी शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.