भीषण अपघातात SDPO संजय पूजलवार सह चालक गंभीर जखमी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी : वणी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या शासकीय वाहनाचा राळेगाव जवळ अपघात झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार सह चालक जखमी झाल्याची घटना रात्री 9 वाजताचे सुमारास घडली.

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार हे यवतमाळ येथे आस्थापना च्या बैठकीला गेले होते. बैठक आटपून ते आपल्या शासकीय वाहनाने राळेगाव मार्गाने वणी कडे येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या हाताला इजा झाली असून चालक परेश मानकर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.