चंद्रपूर : अखेर घुग्घूस नगरपरिषद जाहीर झाली असून तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव येण्यास उशीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे नवा घोळ निर्माण झाला असेही वडेट्टीवार म्हणाले. घुग्घुस नगर परिषदेच्या स्थापनेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत घुग्घुस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकानेही नामांकन अर्ज दाखल केले नाही. नामांकन दाखल करण्याचा बुधवार शेवटचा दिवस होता. सर्वपक्षीय नेत्यांची अशाप्रकारची अभूतपूर्व एकी जिल्ह्यात पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली. प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.मात्र आता घुग्घूस नगरपरिषद जाहीर झाली असून तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.