कोरपना नगरपरिषद | मतदार यादीत समाविष्ठ असलेले बोगस नावे न वगळल्यास निवडणुकीवर बहिष्कार

0
15

सर्वपक्षीय नेत्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

उचित कार्यवाही राबवून बोगस नावे वगळण्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे आश्वासन

कोरपना : निवडणूक आयोगाकडून मतदारांची नावे नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली, परंतु या सुविधेचा लाभ बोगस मतदार नोंदणी करवून घेण्यासाठी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गावात नसलेल्यांची सुद्धा नावे स्थानिक मतदार यादीत दिसून येत असल्याने कोरपना मतदार यादीमधिल बोगस मतदारांची नावे तातडीने वगळावीत अशी मागणी कोरपना येथील भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी, शेतकरी संघटना पक्ष प्रमुखानी आज मा. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
स्थानिक मतदार यादीत बोगस मतदारांचे नावे मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यात आल्याने या नावावर नमुना ७ चे आक्षेप अर्ज रीतसर सादर केल्याने निवडणूक विभागाकडून त्या मतदारांना नोटीसाद्वारे ठोस पुराव्यानिशी तहसील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले परन्तु सर्व मतदार हे कोरपना मूळचे नसल्याने वा त्यांचेकडे कुठलाही पुरावा नसल्याने ते दि. १० डिसेंबरला सुनावणी दरम्यान अनुपस्थित राहिले.व बीएलओ नि सदरचे मतदार हे या ठिकाणी राहत नसल्याचे नमूद केले.व अशा मतदाराने कायद्याचे उल्लंघन करून मा.निवडणूक आयोगाच्या निर्देशांना धाब्यावर बसवण्यासारखे प्रकार करणार्‍या बोगस, स्थलांतरित मतदाराचे नावे मतदार यादीतून वगळण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या नगरपंचायतच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू. असा सूचक इशारा यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी दिला.
याप्रसंगी उपस्थितांशी चर्चा करतांना, सदरहू प्रकरणाची चौकशी करून उचित कार्यवाही राबवून बोगस नावे वगळण्यात येतील. असे आश्वासन मा. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.
यावेळी, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शिवसेना तालुका अध्यक्ष अरविंद मसे, शेतकरी संघटना युवक जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीनिवास मुसळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली, युवा स्वाभिमानी तालुका अध्यक्ष मोहबत खान,नगरसेवक अमोल आसेकर, किशोर बावणे, अॅड. पवन मोहितकर,युवा स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष मोहम्मद खान, प्रदीप पिपळशेंडे यांसह आदी मंडळी उपस्थित होते आता मा निवडणूक निर्णय अधिकारी काय कार्यवाई करतील याकडे सम्पूर्ण कोरपना वासींचे लक्ष लागले आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleस्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here