ग्रामपंचायत निवडणूक | मुल  24, पोंभुर्णा 17, चंद्रपूर 12 तर बल्‍लारपूर तालुक्‍यात 8 ग्राम पंचायतींवर भाजपाचे वर्चस्‍व

0
51

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा मतदार संघ असलेल्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर या तालुक्‍यातील ग्राम पंचायत निवडणूकीमध्‍ये भारतीय जनता पार्टी समर्थीत शेतकरी ग्रामीण विकास आघाडी पॅनलने लक्षणीय यश संपादन केले आहे. आ. मुनगंटीवार यांच्‍या विकासाच्‍या झंझावातातुन साकारलेल्‍या ग्राम पंचायत निवडणूकीतील या यशाने पुन्‍हा एकदा विकासावर शिक्‍कामोतर्ब केले आहे.

बल्‍लारपूर तालुक्‍यातील 10 पैकी 8 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने मानोरा, हडस्‍ती, नांदगांव पोडे, कळमना, कोर्टीमक्‍ता, आमडी, पळसगांव, गिलबिली या ग्राम पंचायती भाजपाच्‍या ताब्‍यात आल्‍या आहेत.

मुल तालुक्‍यातील 37 ग्राम पंचायतींपैकी 24 ग्राम पंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने मारोडा, हळदी, पिपरी दिक्षीत, येरगांव, बोरचांदली, जानाळा, चिरोली, गोवर्धन, नवेगांव, जुनासुर्ला, उथळपेठ, भवराळा, विरई, फिस्‍कुटी, बोंडाळा बुज., भादुर्णी, काटवन, डोंगरगांव, चितेगांव, चिखली, चिचाळा, मुरमाडी, गांगलवाडी या ग्राम पंचायती भाजपाने ताब्‍यात घेतले आहेत.

चंद्रपूर तालुक्‍यातील 16 पैकी 12 ग्राम पंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने भटाळी, कोळसा, नागाळा, मोहर्ली, पदमापूर, अंभोरा, खैरगांव, सिनाळा, वरवट, लोहारा, निंबाळा, बोर्डा या ग्राम पंचायती भाजपाने ताब्‍यात घेतल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे मारडा, ताडाळी, नकोडा, विचोडा बुज., बेलसनी, आरवट, सोनेगांव, सिदुर, वेंडली या ग्राम पंचायतींवर सुध्‍दा भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.

पोंभुर्णा तालुक्‍यातील 27 ग्राम पंचायतींपैकी 17 ग्राम पंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने भिमणी, चिंतलधाबा, नवेगांव मोरे, पिपरी देशपांडे, सातारा तुकूम, वेळवा, उमरी पोतदार, घाटकुळ, केमारा, चेक बल्‍लारपूर, चेक हत्‍तीबोडी, मोहाडा, चकठाणेवासना, फुटाणा, जुनगांव, दिघोरी, घनोटी तुकूम या ग्राम पंचायती भाजपाने ताब्‍यात घेतल्‍या आहेत.

हा विजय माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विकासाच्‍या झंझावाताचे फलीत असून यापूढील काळातही विकासाचा हा झंझावात असाच वेगाने भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन आम्‍ही पूढे नेणार असल्‍याची भावना जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा कु. अलका आत्राम, भाजपा नेते रामपाल सिंह, गजानन गोरंटीवार, किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, राजू बुध्‍दलवार, चंदू मारगोनवार, हनुमान काकडे आदींनी व्‍यक्‍त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here