पोलीस ठाण्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यां चा ठिय्या
गोंडपिपरी (चंद्रपूर) : तालुक्यातील एकूण 43 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा आज निकाल पार पडला.निकाल आटपून स्व गावी परतलेले काँग्रेसचे धाबा येथील प्रभाग क्रमांक एकचे तीनही विजयी उमेदवार यांनी मतदारांचे आभार मानण्या करिता औपचारिक रित्या विजय सभेचे आयोजन केले.
याच दरम्यान तेथीलच भाजपा पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या सूरज भस्की नामक युवकाने विजय सभेत विरजण पाडण्याचा प्रयत्न करता च दोन्ही गटात बाचाबाची होऊन वाद विकोपाला जाण्याच्या स्थितीत असताना पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न चालविला मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित विजय सभेत धुडगूस घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर आग्रही भूमिका घेत चक्क पोलीस ठाण्यासमोर एकवटून ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सुरज भस्की या युवकास तत्कालीन सरपंच यांचे घरून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. घटना लिहिली पर्यंत पोलिसांनी संबंधित भाजप कार्यकर्त्यावर कुठलीही कुणाची नोंद केलेली नव्हती.