राजकीय आश्रयाखाली फरार असल्याच्या चर्चाना उधाण; आरोपी वेकोली कामगार
राजुरा (चंद्रपूर) : लग्नाचे अमिश दाखवून मागील सात महिन्यापासून पीडित मुलीवर अत्याचार करणारा प्रवीण मोरे मागील पंचेविस दिवसापासून राजुरा पोलिसांच्या नजर चुकवून लपला होता, मात्र उशिरा का होईना अखेर राजुरा पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे.
राजुरा शहरापासून बारा किमी अंतरावर असलेल्या करोडपती गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरी (वाघोबा) येथील वेकोली कामगार प्रवीण श्रावण मोरे (वय २५) हा नराधम एका गरीब मुलीच्या आर्थिक असहाय्यतेचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून मागील सात महिन्यापासून तिच्यावर अत्याचार करीत होता. पीडित मुलीने लग्नाची मागणी घातल्यानंतर आरोपीने नकार देऊन पळ काढल्याने पीडित मुलीने प्रवीण मोरे विरोधात आपली लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार (दि.६ सप्टेंबर) राजुरा पोलीस स्टेशन येथे दाखल केली. तेव्हापासून आरोपीला राजकीय सुरक्षा कवच देऊन फरार करण्यात आले असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली. राजुरा पोलीस पंचेविस दिवस आरोपीच्या शोधात होते अखेर (दि.३०) चंद्रपूर येथून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
पीडितिच्या घरची परिस्थिती हलाकीची असून तिला वडील नसल्याने ती आपल्या आईसह आजीकडे राहत होती. तिच्यावर वेकोलित कामगार असलेल्या प्रवीण मोरे या आरोपीची नजर गेल्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत नेहमी शाररिक संबंध ठेवीत होता मात्र लग्नाची गोष्ट काढताच नकार देऊन पसार झाला असून त्याच्यावर राजुरा पोलीस स्टेशन येथे पास्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या करोडपती गाव म्हणून ओळख असलेल्या साखरी या गावात गर्भ श्रीमंती दडली असल्याने येथील काही गर्भ श्रीमंत लोक गरीब जनतेच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांचे शोषण करीत असल्याचा गंभीर प्रकार काही दिवसांपासून सुरु असून गरिबी व लाजेच्या भीतीने पीडित समोर येत नसल्यामुळे अनेक घटना आर्थिक वजनाने दाबल्या गेल्याची खमंग चर्चा गावात सुरु आहे.