ज्यांनी मारले धोटेंच्या फोटोला जोडे, तेच समोर बसून भाषण ऐकले

0
973

चंद्रपुर : ज्या ओबीसी नेत्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर समाज माध्यमात टिका केली म्हणून भाजपातील ओबीसी नेत्यानी तुरूंगवास घडविला, त्यांच्या पुतळा जाळला, त्यांच्या छायाचित्राला चप्पला जोडे मारले. त्याच ओबीसी नेत्यांच्या मोर्चात भाजपच्या ओबीसी नेत्यांना श्रोता म्हणून मोर्चेकांमध्ये बसण्याची वेळ आली. ते नेते म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे. त्यांच्यासमोर भाषण देत होते ओबीसी नेते बळीराज धोटे. सध्या हा विषय राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलाच चर्चेचा झाला आहे. वेळेचे चक्र कसे फिरते ? ते या निमित्ताने ही दिसून आले. पद आणि प्रतिष्ठा लोकाच्या रेट्यासमोर खुजी होते, हे सुद्धा या निमित्ताने दिसून आले.

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी संविधान दिनी 26 नोव्हेंबरला चंद्रपुरात विशाल ओबीसी मोर्चे चे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा ऐतिहासिक झाला. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज स्वखर्चाने या मोर्चात सामिल झाले.
या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे ओबीसी सामाजिक नेते मंचावर होते तर ओबीसी समाजाचे राजकिय नेते मंचा खाली बसले होते.
ओबीसी नेते बळीराज धोटे हे मंचावरून संबोधन करीत असतांना राजकीय ओबीसी नेते मंचा खालून धोटे यांचे संबोधन ऐकत होते.
जेमतेम वर्षभरा पूर्वी 25 ऑगस्ट 2019 रोजी बळीराज धोटे या ओबीसी नेत्या ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर समाज माध्यमातून टीका केली म्हणून भाजपातील ओबीसी नेत्यांनी प्रचंड प्रमाणात आगपाखड करीत पहाटे 4 वाजता त्यांना अट्टल गुन्हेगारां प्रमाणे राजकीय दबावात अटक करायला लावली. त्यांच्यावर चंद्रपूर, मूल, सावली येथे गुन्हे नोंदविले. धोटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल-जोडे मारले. पुतळ्याचे दहन केले. या प्रकरणात त्यांना तुरुंगवास ही घडविला. या पद्धतीचा आंदोलन करणारे नेते म्हणजेच भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे हे होते. आज हेच नेते मोर्चेकऱ्यात तर धोटे मंचावर होते.
तुमच्याकडे किती ही मोठे पद असले तरी समाजाच्या व जनतेच्या एकते पुढे हे पद खिजगणतीतही येत नाही ?
जेव्हा काळाची चाके वेगाने फिरतात, मागच्याला पुढे आनि पुढच्याला मागे खेचण्यास वेळ लागत नाही हेच या विशाल मोर्च्यात सहभागी जनतेत चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here