चंद्रपूर : ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या न्यायसंगत मागणीला घेऊन संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी निघालेल्या विशाल ओबीसी मोर्च्याच्या आयोजकांवर कोरोना काळात विना परवानगी मोर्चा काढल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केले.
तर दुसरीकडे 21 नोव्हेंबरला भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसा निमित्य आचारसंहितेचे उल्लंघन करून घुग्घुस येथील गांधी चौकात आतिषबाजी करून 21 किलोचा केक कापत कोरोना माहामारी पासून बचावाचे सर्व नियम पायदळी तुडवीत वाढदिवस साजरा करण्यात आला. म्हणजेच नेत्यांच्या बर्थ डेला सवलतीचे सेलिब्रेशन; ओबीसी मोर्चाला अजब शासन अशी अवस्था निर्माण झाली आहे
या कार्यक्रमात रक्तदान करणारा कार्यकर्ता व अन्य पदाधिकारी कोरोना संक्रमित मिळाले असून या तुफान गर्दीच्या उत्सवात सामील असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते संपूर्ण घुग्घुस शहरात पसरले असून यांच्यामुळे ही महामारी विक्राळ रूप घेऊ शकते ? मात्र, यांच्यावर प्रशासनाची सदैव कृपा असते यापूर्वी ऐन कोरोना मधील लॉकडाऊन काळात ही प्राध्यापक असलेल्या नेत्याच्या वाढदिवसात 26 केक कापून आतिषबाजी करून धमाल पार्टी करण्यात आली होती.
त्यानंतर वारंवार कधी जनधन खाते, कधी वीज बिल आंदोलन, कधी वाढदिवस या – ना – त्या कारणाने यांच्यातर्फे नियम पायदळी तुडविल्या जाते मात्र लग्नात दहा – वीस पाहुणे जास्त आले व काही वराती संक्रमित मिळाले म्हणून गरीबावर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र यांची वेळ येताच प्राशासन मूग गिळून गप्प का बसतो ? हे कधीच न सुटणाऱ्या कोड्या प्रामाने झालेले आहे..