हळव्या मनाच्या शीतल ने आनंदवनाला कायमस्वरूपी केले अलविदा

0
205

मुलगा शरवीलचा 4 डिसेंबरला वाढदिवस होता

बाबा आमटेंच्या शेजारी श्रद्धा वनात दिली जाणार मूठमाती

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांनी ता 30 ला आनंदवनातील आपल्या राहत्या घरी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आत्महत्या केली. आनंदवनात त्या त्यांचे पती आणि मुलगा वेगळे राहात होते. त्यांनी आपल्या घरातील आपल्या खोलीत इंजेक्शन लावून आत्महत्या केली. तात्काळ त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णलायत दाखल करणयात आले मात्र डॉक्टराणी त्यांना मृत घोषित केले. हायफ्रॉफाईल केस असल्याचे कारण देत पोलिसानी तद्दन डॉकटरांच्या कडून पोस्टमार्टम व्हावे म्हणून चंद्रपूर येथे पोस्टमार्टम करिता पाठविले.
आमटे कुटुंबातील सर्व सदस्य हेमलकसा येथे गेले असतांना शीतल यांनी तिच्या घरी आत्महत्या केली .शीतल आमटे यांचे सासू सासरे दिवाळी निमित्त घरी आले होते.
चार वर्षा पासून त्या माहारोगी सेवासमिती आनंदवन च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहात होत्या. आनंदवनाचे नव्या काळाला अनुसरून विस्तारताना त्याला नवनवीन आयाम देण्यासाठी आणि विविध प्रोजेक्ट राबविन्यासाठी सतत धडपनाऱ्या डॉ शीतल आमटे यांनी शिक्षण क्षेत्रात नवीन अभ्यासक्रम व सुविधा आणल्या .दिवव्यानगच्या पुनर्वसनासाठी निसबल प्रकल्प राबविला. आनंदवनात घनवन प्रकल्प राबविला त्या द्वारे अनेक वृक्ष लावली आणि जतन केली. हँडीकाप लोकांसाठी गोधळी प्रकल्पाची तयांनी सुरवात आनंदवनात केली.

विशेष म्हणजे वडिलाची लाडकी होती, मुलागा शरवील चा येणाऱ्या 4 डिसेंबर ला वाढदिवस आहे. शीतल आमटे यांना 6 वर्षाचा शरवील नावाचा मुलगा आहे 4 डिसेंबर ला त्यांचा वाढदिवस आहे वृक्षरोपण करून त्याचा वाढदिवस करण्याचा त्यांनी बेत आखला होता. दर महिन्याच्या 4 तारखेला त्या वृक्षरोपन करीत होत्या. झाडांवर त्यांचे विशेष प्रेम होते.

चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक साळवे, एसडीपीओ निलेश पांडे, ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी आत्महत्या केलेल्या घराची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here