“घुग्घुस नगरपरिषद गुम हो गई’ ? सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याना चपराक

0
200

नगर विकास विभागाच्या पत्राने नगरपरिषदेच्या आशा पल्लवीत

चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगिक नगरी घुग्घुस 27 वर्षांपासून ग्रामपंचायतला नगरपरिषदेत रूपांतर व्हावे या मागणी करीता विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आंदोलन करीत होते. राज्यात सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले असता घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या माध्यमातून घुग्घुस नगरपरिषदची मागणी सत्तात्त्याने उचलून लावली त्याची फलश्रुती पालकमंत्री यांनी नगरपरिषद करिता हिरवी झेंडी दाखवली व तात्काळ नगरपरिषदची प्रथम अधिसूचना ही शासकीय स्तरावर जाहीर करण्यात आली.

ग्रामपंचायतला नगरपरिषदेत रूपांतराची प्रक्रिया शुरू असतांनाच मुद्दत संपलेल्या ग्रामपंचायतचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले. ही जाहीर झालेले निवडणूक कार्यक्रम रद्द व्हावा व घुग्घुस विकासाला पोषक नगरपरिषद व्हावी ही तळमळ घेऊन राजूरेड्डी व सैय्यद अनवर हे तातळीने मुंबईला रवाना झाले.

एकीकडे दोन दिवसीय अधिवेशनाची गडबड असतांना ही पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन ही निवळणूक रद्द करण्याची मागणी केली.
त्यांनी तात्काळ या मागणीची दखल घेऊन नगर विकास विभागाला निवडणूक आयोगाने ह्या निवडणूका रद्द करण्या संदर्भात पत्र पाठविले एकीकडे मुंबई मध्ये ही धडपड शुरू असतांना चंद्रपुरात भाजप नेते जिल्हाधिकारी यांना नगरपरिषद निर्मिती करिता निवेदन देऊन आपला दुटप्पीपणा दाखवीत होते, तर काही टॉवर चढणारे स्वयंम भु जनहितेशी नेते समाज माध्यमावर नगरपरिषद अधिसूचना निघाल्याच्या वेळेस पालकमंत्री यांच्याप्रति आभार व्यक्त करणारे बॅनरचे पोस्टर घेऊन  “घुग्घुस नगरपरिषद गुम हो गई’  अश्या प्रकारे टिंगल उडविण्यात धन्यता मानत होते.

27 वर्षापासून राजकीय डावपेचात अडकलेली घुग्घुस नगरपरिषद निर्मिती इतकी सोपी नाही त्याच्यासाठी कठोर परिश्रम व चिकाटी आवश्यक आहे. करीता आज राजूरेड्डी व सैय्यद अनवर हे घुग्घुस येथील नागरिकांच्या उमेदीवर खरे उतरत असल्याचे दिसत आहे. नगरविकास विभागाने दहा ग्रामपंचायत निवडणूक तीन महिन्याकरीता रद्द कराव्या ही मागणीचे पत्र समाज माध्यमावर प्रकाशित होताच घुग्घुस येथे आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here