ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा.गो. वैद्य यांच्या निधनाने प्रामाणीक, निस्वार्थ भावनेने देशकार्यासाठी आयुष्य वेचणारा सच्चा संघ स्वयंसेवक, हाडाचा पत्रकार हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श स्वयंसेवक, संस्कृत पंडित, शिक्षक, पत्रकार, विधान परिषद सदस्य अशा विविध भुमिका मा.गो. वैद्य यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. राजकीय क्षेत्र असो वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोपविलेले कार्य, मिळालेल्या प्रत्येक जवाबदारीला मा.गो. वैद्य यांनी शतप्रतिशत न्याय दिला. संघकार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. संघाने दिलेली जवाबदारी सांभाळण्यात त्यांनी स्वतःला झोकुन दिले. देश घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगुन स्वयंसेवकांची वाटचाल सुरु असते, अशा स्वयंसेवकांमधील एक म्हणजे मा.गो. वैद्य होत. या ज्येष्ठ विचारवंताच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही आ. मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.