आतिशबाजी व लाडू वितरण करून घुग्घूस नगरपरिषदेचा जल्लोष साजरा

0
429
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस (चंद्रपूर) : जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा याकरीता मागील 27 वर्षांपासून घुग्घुस येथील विविध राजकीय व सामाजिक संघटना लढा देत आहेत.
या संघर्षाला 31 डिसेंम्बर 2021 रोजी पूर्णविराम लागला असून
नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच घुग्घुस वासीयांना नगरपरिषदेच्या रुपात नववर्षाची भेट मिळाली आहे.
मात्र दुसरीकडे जिल्हापरिषदच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. नितु विनोद चौधरी, व पंचायत समिती उपसभापती निरीक्षण तांड्रा यांची पदे रिक्त होणार आहे.
तर पंचायत समितीच्या सदस्या सौ. रंजीता पवन आगदारी यांनी नगरपरिषदे करीता आधीच आपला राजीनामा सादर केलेला आहे.

राज्यात सत्ता परिवर्तन होताच महाविकास आघाडीचे सरकार आले व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घुग्घुस नगरपरिषदेला हिरवा कंदील दाखविला व लगेच 31 आगस्ट रोजी नगरपरिषदेची प्रथम अधिसूचना ही जाहीर झाली
यानंतर राज्यातील मुद्दत संपलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्यामूळे घुग्घुस येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला व सर्वच राजकीय पक्ष एकत्रितपणे येऊन ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार घेतला व आंदोलनाची मालिका शुरू केली.
व मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आमदार सर्वच राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाना निवेदन देण्यात आली.
घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी मुंबई येथे तळ मांडून पालकमंत्री साहेबांना घुग्घुस ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करून नगरपरिषदेची तात्काळ निर्मिती करीता सततचा पाठपुरावा केला
यामुळेच दिनांक 31 डिसेंम्बर 2020 रोजी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी घुग्घुस नगरपरिषदेची घोषणा केली यामुळे घुग्घुस परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले

आज दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी घुग्घुस काँग्रेस पक्षा तर्फे काँग्रेस कार्यलय परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना लाडू चारून जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष रोशन पचारे, एस.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेता सैय्यद अनवर, कल्याण सोदारी, शहजाद शेख, बालकिशन कुळसंगे, रमेश रुद्रारप, सुनील पाटील, नुरूल सिद्दीकी, सचिन कोंडावार,अंकेश मडावी व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.