मामा तलावात जाळ्यात अडकले मगर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• मगराला बघण्यासाठी तलावावर उसळली गर्दी

चंद्रपूर : मुल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील माल गुजारी तलावात मासेमारीकरीता टाकण्यात आलेल्या जाळ्यात आज शुक्रवारी ५ फुटाचा मगर अडकला. तलावातमगर मिळाल्याची माहिती होताच त्याला बघण्याकरिता गावातील व पररसर्तील नागरिकांनी मोठी गर्दी केली.

मुल तालुक्यातील सुशी दाबगाव गावालगतच्या मामा तलावात मत्य पालनाचा व्यवसाय करण्यात येत आहे. याच तलावात मत्य बीज उत्पादित केल्या जाते. आज सकाळी तलावात नेहमी प्रमाणे मत्य बीज काढण्यासाठी तलावात जाळे पसरवले होते.

त्यात मगर अडकला. सर्व प्रथम जाळ्यात मोठा मासा अडकला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मगराची शेपूट दिसून आल्याने अखेर मगर असल्याचे लक्षात आले. सदर माहिती गाव परिसरात पसरताच बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मगराला पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. सदर मगर हा ताडोबा अंधारी नदीतून आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.