पूरग्रस्तां साठी काँग्रेस SC सेल तर्फे जीवनावश्यक साहित्याची मदद 

पालकमंत्री साहेबांनी दाखविले ट्रॅकला हिरवी झेंडी

चंद्रपूर : महाराष्ट्र अनुसूचित विभाग काँग्रेस चंद्रपूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आवश्यक सामग्री पाठवण्यात आली सर्व साहित्य पुण्याचे काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळूभाऊ धानोरकरआमदार सुभाष धोटे आमदार प्रतिभा धानोरकर आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आले.

यासगळ्या सत्कार्यासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई खोबरागडे, जिल्हा अध्यक्ष पवन आगदारी, जिल्हा अध्यक्ष महिला अनुताई दहेगावकर,शालिनीताई भगत महिला अध्यक्ष चंद्रपूर, सुनिल पाटील जिल्हा उपाध्यक्ष , किरण जुंगरे आशा रामटेके वंदना बेले घडे ताई देशी सोनुले अनिता चवरे अनीता दातार यांनी सहकार्य केले.