घंटागाडी कामगारांना ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या निर्देशानंतर कामबंद मागे

मनपाकडून रक्कम उचलूनही कंत्राटदाराने कामगारांच्या खात्यात वळती न केल्याने घडला संप

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व घंटागाडी कामगारांना जानेवारी ते जून २०२१ पर्यंत एकूण रक्कम ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा केली आहे. याउपरही कामगारांनी मनपाकडून कोणतीही माहिती न घेता अचानकपणे काम बंद केले. कंत्राटदाराने मनपाकडून रक्कम उचलूनही कामगारांच्या खात्यात वळती न केल्याने हा संप घडला. कामगार, कंत्राटदार यांची बैठक महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी समिती सभापती रवी आसवानी आदी पदाधिकाऱ्यांनी घेऊन कंत्राटदाराला सुधारित रक्कम त्वरित त्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे निर्देश दिले. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या निर्देशानंतर कंत्राटदाराने दखल घेऊन कामगारांच्या खात्यात रक्कम दुपारी दोन वाजता जमा केली. यामुळे कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभा ठराव क्रमांक १६/ १६ मार्च २०२१ नुसार महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी १ जानेवारी २०२१ सुधारित किमान वेतन लागू करण्यात आला होता. त्यानुसार घंटागाडी कामगार यांना दिनांक २९ जुलै २०२१ रोजी धनादेश क्रमांक ५७६३३३ नुसार रुपये ४४ लाख ३७ हजार ५१५ रुपये माहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांची रक्कम अदा केली होती. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांसाठी ४५ लाख ८० हजार १८३ रुपये अदा केले आहे. मनपाने महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २७ जानेवारी २०१७ रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व घंटागाडी कामगारांना जानेवारी ते जून २०२१ पर्यंत एकूण रक्कम ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा केली आहे. याउपरही कामगारांनी मनपाकडून कोणतीही माहिती न घेता अचानकपणे काम बंद केले. कंत्राटदाराने मनपाकडून रक्कम उचलूनही कामगारांच्या खात्यात वळती न केल्याने हा संप घडला. कामगार, कंत्राटदार यांची बैठक महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी समिती सभापती रवी आसवानी आदी पदाधिकाऱ्यांनी घेऊन कंत्राटदाराला सुधारित रक्कम त्वरित त्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे निर्देश दिले. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या निर्देशानंतर कंत्राटदाराने दखल घेऊन कामगारांच्या खात्यात रक्कम दुपारी दोन वाजता जमा केली. यामुळे कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. तातडीने निर्णय घेतल्याबद्दल महापौरांचे आभार देखील मानण्यात आले.

कामगारांवर अन्याय झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद महापौरांनी कंत्राटदार यांना दिली. सर्व कामगारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सर्व कामगारांना विनंती करून काम सुरू करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. “आली घंटागाडी आपल्या दारी; स्वच्छ ठेवू आपली नगरी’ अशी घोषणा देत कामगारांनी आज काम सुरू केले आहे.

त्यानंतर महापौरांनी पुढाकार घेऊन दिलेल्या अधिसूचनेनुसार वेतनाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेऊन महापौरांनी अतिरिक्त आयुक्त यांना सूचना देऊन कार्यालयीन पत्र क्रमांक ९५५/ दिनांक २ ऑगस्ट २०२१ अन्वये सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांना महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना २४ फेब्रुवारी २०१५ व २७ जानेवारी २०१७ यामधील तफावतीसंदर्भाने सविस्तर व स्वयंस्पष्ट अहवाल मागविला आहे. त्यामुळे चंद्रपूर स्वच्छ ठेवणाऱ्या घंटागाडी कामगारांना असलेले व शासनाने निर्धारित केलेले वेतन अदा करण्यात आलेले आहेत. त्यातील फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहराला स्वच्छ ठेवणार्‍या सर्व स्वच्छतादूतांच्या सेवेचा सन्मान महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केलेला आहे. त्यामुळे सर्व कामगारांत आनंदाचे वातावरण असून, महापौरांच्या निर्णयाबद्दल कौतुक होत आहे.