धनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकास अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : धनलक्ष्मी फायनान्स कंपनी कडून कर्ज उपलब्ध करून देतो म्हणून प्रोसेसिंग फिचा नावा खाली अनेकांना लाखो रूपयाने गंडा घालणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापक प्रविण सोळंखी यास चंद्रपुरच्या राम नगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

पोलिस सुञांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील किल्ला वार्डातील रहिवासी प्रविण परसराम सोळंखी (वय 30) याने काही साथीदारांच्या मदतीने धनलक्ष्मी फायनान्स सर्विहसेस नावाची कंपनी चंद्रपुर येथे सुरू केली. या कंपनी कडून कर्ज देतो म्हणून अनेक नोकरदार व्यक्तींना हेरून कर्ज देण्याचे आमिष दाखविले. कर्ज मिळण्यासाठी प्रोसेसिंग फिचा नावाखाली लाखो रूपये कर्ज घेण्या-या व्यक्ती कडून उकळले. हि फि भरल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात कर्ज मिळुन जाईल असे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात कोणालाही कर्ज दिले नाही. असा प्रकार अनेक व्यक्तीं बाबतीत घडला.

या बाबत चंद्रपुर येथील नगीनाबाग वार्डातील कंत्राटदार दिंगाबर पांडुरंग आत्राम (वय 66) यांना ठेकेदारी व्यवसाय करिता पैशाची आवश्यकता भासल्याने विजय पुसाटे इंदिरा नगर चंद्रपुर यांचा मध्यस्थी ने प्रविण सोळंखी याचा सोबत भेट झाली. यावेळी प्रविन सोळंखी याने दिगांबर आत्राम यांना पंधरा लाखाचे कर्ज देण्याचे मान्य केले. व त्याकरिता प्रथम पाच लाख रूपये भरण्यास सांगितले. त्यानुसार आत्राम यांनी प्रथम दोन लाख डिमांड ड्राफ्ट चा स्वरूपात व नंतर तिन लाख रोख स्वरूपात दिले. त्यानंतर आत्राम यांनी सोळंखी याला कर्ज मिळण्यासाठी अनेकदा विचारणा केली असता. सोळंखी याने उडवाउडवीचे उत्तर देऊन कर्ज उपलब्ध करून दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोळंखी याला दिलेले पाच लाख रूपये परत मागितले असता ते परत केले नाही. अखेर आत्राम यांनी दि. 21 सप्टेंबर 2020 रोजी चंद्रपुर येथील रामनगर पोलिस स्टेशन मध्ये सोळंखी चा विरोधात तक्रार दाखल केली. तसेच दि.16 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अंकुश आगलावे यांनी 15 पिडितांसह एका निवेदनाद्वारे धनलक्ष्मी फायनान्स सर्विहसेस या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली.

त्यानुसार रामनगर पोलिसांनी दि.16 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आरोपी विरूद्ध भा.द.वि. 420, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यात भद्रावती येथील प्रविन सोळंखी व समीर अन्सारी तसेच नागपुर येथील पांडे नामक समावेश आहे. या तिन आरोपी पैकी प्रविन सोळंखी याला रामनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली असुन उर्वरित दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.