शासकीय इमारतीचा व्यवसायिक वापर करणाऱ्यावर कारवाई करून इमारत ताब्यात घ्या !

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : रोशन पचारे

चंद्रपूर : नग्ररिषद घुग्घुस येथील वॉर्ड क्रं.सहा मधील जनता कॉलेज रोडवरील तुकडोजी नगर येथील ग्रामपंचायत सभागृह मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विवेक बोढे यांचे लहान बंधू विनय बोढे हे कराटे प्रशिक्षणासाठी वापर करीत

असून याठिकाणी कराटे शिकवणी वर्ग घेतात व त्यांची फी आकारणी सुद्दा केली जाते. ही इमारत शासकीय असून या इमारतीचा खाजगी वापर करून विजेचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जातो याचा भुर्दंड घुग्घुस येथील सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

या शासकीय इमारतीचा व्यवसायीक वापर करणाऱ्यावर तातळीने कारवाई करून ही इमारत नगरपरिषदने येत्या आठ दिवसांत ताब्यात घ्यावी याकरिता जिल्हा किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन मागणी केली असून येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास घुग्घुस नगरपरिषद ते शासकीय सभागृहा पर्यंत लोटांगण आंदोलनाचा इशारा पचारे यांनी दिला आहे.