गटाच्या पक्षादेशाचे उल्लंघण; चिमूर नगर परिषदेचे चार नगरसेवक अपात्र

0
262
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
  • जिल्हाधिकारी यांचा आदेश नगर विकास मंत्रालयाने ठेवला कायम
  • नगरसेवकांना ठरावाच्या बाजूने करावयाचे होते मतदान
  • पदाच्या कालावधीपर्यंत नगरसेवकांना निवडणूक लढण्यास बंदी

चंद्रपूर : अपक्ष नगरसेवकांच्या समर्थनाने सत्ता स्थापन करून निर्माण करण्यात आलेल्या गटाने पाणी पुरवठा योजना कार्यान्वित हस्तांतरण ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी गटाने काढलेल्या पक्षादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला कायम ठेवीत राज्याच्या नगर विकास मंत्रालयाने काल शुक्रवारी 5 मार्च 2021 ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर नगर परिषदेच्या चार नगरसेवकांना त्यांच्या पदाच्या कालावधीपर्यंत अपात्र केले आहे. या निर्णयामुळे जिह्यात राजकीय वर्तृळात मोठी खळबळ उडाली आहे. यापुढे समर्थन देवून विरोधी कारवायांना करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. या नगरसेवकांची भविष्यात निवडणुक लढण्याचे स्वप्न भंगणार आहे.

चिमूर नगर परिषदेच्या 2 नोव्हेंबर 2015 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत एकूण सतरा सदस्य निवडून आलेत. त्यात भारतीय जनता पार्टी 6, अपक्ष 4 आणि उर्वरित इतरपक्षाचे उमेदवार नगर सेवक म्हणून निवडून आले. चार अपक्ष आणि भाजपाचे सहा असे दहा पक्ष आणि मित्रपक्षांचा गट स्थापन करण्यात आला. आणि नगर परिषदेमध्ये आपली सत्ता स्थापन केली. तर गटाच्या गटनेत्या म्हणून छाया कंचर्लावार यांची नियुक्तीही करण्यात आली. सदर दहाजणांच्या गटास जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी, 6 नोव्हेंबर 2015 रोजी मान्यताही दिली.

10 एप्रिल 2018 रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्यान महाअभियान अंतर्गत मंजूर चिमूर पाणी पुरवठा योजना, जिवन प्राधिकरणाकडे कार्यान्वित यंत्रणा म्हणून हस्तांतरीत करण्याबाबतच्या ठरावाला गटातील सर्व सदस्यांनी ठरावाचे बाजूने मतदान करावे व सदर ठरावाला एकमताने मंजुरी देण्याबातचा पक्षादेश 9 मार्च 2018 रोजी काढून विद्यमान नगरसेवकांकरिता काढण्यात आलेला होता. सर्व नगरसेवकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवरील व्हॉटसॲपवर पाठविण्यात आलेला होता. मात्र गटाच्या पक्षादेशाला झुगारून भाजप आघाडीतील एक व तीन अपक्ष नगरसेवक जयश्री बाबा निवटे, तुषार विकास शिंदे, तुषार केशवराव काळे व नितेश शांताराम कटारे यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याबाबत उल्लंघण केले. त्यामुळे गटाच्या पक्षादेशाचे उल्लंघन केल्यामुळे चारही नगरसेवकांविरोधात 1965 च्या कलम 16 व 1986 च्या कलम (3)(1)(अ) व कलम 7 नुसार अपात्र ठरविण्याबाबत ची तक्रार गटनेत्या छाया कंचर्लावार यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी 3 ऑगस्ट 2019 रोजी निर्णय देत त्या चार नगरसेवकाना त्यांच्या पदाच्या कालावधीकरिता पदावरून अपात्र ठरविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात त्या चार नगरसेवकांनी नगर विकास मंत्रालयाचे मंत्री महादेयांकडे अपील घेतली केली होती. त्यास मंत्री महोदयांनी तात्पुरती स्थगिती देऊन प्रकरण सुनावणीस ठेवले होते.

26 फेब्रुवारी 2021 ला नगर विकास मंत्रालयाचे मा. मंत्री महोदयांनी चाही नगरसेवक आणि गटनेत्या छाया कंचर्लावार यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अंतीम सुनावणी पार पडली. दरम्यान अंतीम सुनावणचा निर्णय राखून ठेवण्यात आलेला होता. अंतीम सुनावणीचा निर्णय काल शुक्रवारी 5 मार्च 2021 ला जाहीर करण्यात आला. त्यात जयश्री निवटे, तुषार शिंदे, तुषार काळे व नितेश कटारे यांच्या बाबत 30 ऑक्टोबर 2019 चा अपील अर्ज अमान्य करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या 3 आगस्ट 2019 च्या आदेशास दिलेली स्थिगिती उठवून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम 1986 तील कलम (3) नुसार दाखल अर्जाबाबत केलेला पारित केलेला क्र 26/2019 दि 3 आगस्ट 2019 रोजीचा आदेश कायम ठेवला आहे. यामुळे निर्णयामुळे चार नगरसेवक पदाच्या कालावधीकरिता अपात्र ठरले असून पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढण्यास चाप बसला आहे. नगर विकास मंत्रालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तृळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सध्या नगरपरिषदेचा कार्यकाळ संपुष्ठात आल्यामुळे चिमुर नगरपरिषदेवर प्रशासक बसविण्यात आलेला आहे. त्यांच्या हातात सध्या नगर परिषदेचे सुत्र आहेत. मात्र आज ना उदया निवडणुक होईल या आशेने हे चारही नगरसेवक आशाबाळगून होते. परंतु त्यांच्या पदाच्या कालावधीकरिता त्यांना अपात्र केल्याने त्यांचे निवडणूकीचे स्वप्न् भंगले आहे.