साक्षगंध आटोपले ; हळद लागण्यापूर्वीच युवतीची आत्महत्या

0
2409
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

स्वतःला जाळून घेत जिवन संपविले

चंद्रपूर : काही दिवसांपूर्वींच साक्षगंध आटोपले आणि लग्नाची तयारी सुरू झाली. मात्र महिनाभरावर लग्न आले असतानाच हळद लागून बोहल्यावर चढण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 22 वर्षीय युवतीने स्वत: ला जाळून घेत जिवनयात्रा संपविली. ही घटना भद्रावती तालुक्यातील कान्सा येथे शुक्रवारी घडली.

नीलिमा प्रमोद काकडे असे मृत युवतीचे नाव आहे. विशेष म्हणजे या युवतीच्या वडिलानेही आठदहा वर्षापूर्वी आत्महत्या करून जिवनयात्रा संपविली आहे. तर भावाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आईसोबत असलेल्या मुलीनेही जिवन संपविल्याने आता आईला एकटीच अश्रू ढाळीत जिवन जगावे लागणार आहे. या हदयद्रावक घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

भद्रावती तालुक्यातील कान्सा येथील प्रमोद काकडे निवासी होते. पत्नी, मुलगा मुलगी असा छोटासा परिवार होता. मात्र घरचा कर्ता असलेला प्रमोद काकडे यांनी दहा वर्षापूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या करीत जिवनयात्रा संपविली. त्यामुळे घरातील कर्त्याची जबाबदारी आईवर आली. वडिलाच्या निधनानंतर जबाबदारी पार पाडीत परिवाराचा सांभाळ केला. मात्र नियतिला तेही मान्य नव्हते आणि दुसऱ्या संकटाची चाहुल परिवारावर होतीच. मुलाचाही मृत्यू अपघातात झाला. त्यांनतर आई व मुलगी हे दोघेच कुटूंबात राहिले. आई मोलमजुरी करून मुलीला दोघींचा जिवन जगत असताना मुलगी वयात आल्याने तिचा विवाह करण्याचे आईने ठरविले आहे. आपल्या मुलीला साजेसा असा वरमुलगा पाहून निलीमाचा साक्षगंध आटोपला. आणि तयारी सुरू झाली विवाहाची. अगदी महिनाभरावर विवाह येऊन ठेपला असताना शुक्रवारी 22 वर्षीय युवती निलिमाने स्वत:ला घरीच जाळून घेतले. घटना लक्षात येताच तिचा वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमी युवतीचे जिव वाचविण्याकरिता जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र नियतीला हेही मान्य नव्हते दुसऱ्या दिवशी शनिवारी निलीमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्यंत हदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भद्रावती पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून युवतीने कोणत्या कारणासाठी स्वत: जाळून घेत जिवनयात्रा संपविली याचा शोध पोलिस घेत आहेत.

पती आणि मुलगा जग सोडून गेल्यानंतर आईने मुलीच्या सहाऱ्याने जिवन जगले. मात्र मुलीनेही जिवनयात्रा संपवून जगाचा निरोप घेतल्याने आईला एकटीच अश्रूढाळीत वेदनादायी जिवन जगावे लागणार आहे.