चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

0
1124

यवतमाळ : मारेगाव तालुक्यात शुक्रवारी ला 2 वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या टाक्यात पडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वेदांत विजय खोके (2)असे मृत बालकाचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी तो खेळता खेळता पाण्याच्या टाक्यात पडला. वेदांत बऱ्याच वेळेपासून दिसत नसल्याने त्याच्या आई ने शोधाशोध केली. संपूर्ण परिसर पालथा घातला मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. काही वेळाने तो चिमुरडा घरच्या अंगणातील पाण्याच्या टाकीत आढळून आला. त्याला लगेच वणीतील सुगम हॉस्पिटल  मध्ये त्याला आणण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने कोरंबी (मारेगाव) या गावात शोककळा पसरली आहे.