मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार

0
463
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ : जिल्ह्यात झरी तालुक्यातील बोपापुर येथील 35 वर्षीय विवाहितेला तुझ्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या कृषी केंद्र चालकाला विवाहितेचा तक्रारी वरून अटक करण्यात आली आहे.
35 वर्षीय विवाहिता ही झरी तालुक्यातील बोपापूर येथे आपल्या परिवारास राहते. विवाहितेचा सात वर्षाचा मुलगा वणी येथील एका शाळेत शिक्षण घेत असल्याने त्याला विवाहितेने वणी येथे असलेल्या आपल्या आई जवळ ठेवले होते.

मुलाला भेटण्यासाठी पीडित विवाहिता वणी येथे येत होती. विराणी टॉकीज परिसरात असलेल्या कृषी केंद्र धारक संजय पिंपळकर वय 35 हा वीवाहितेच्या पतीचा मित्र असल्याने त्याचे सोबत ओळख होती. फेब्रुवारी 2020 मध्ये विवाहिता आपल्या मुलाला भेटण्यासाठी वणी येथे आली असता संजय पिंपळकर याने तिला फोन केला व विवेकानंद शाळेजवळ भेटण्यास बोलावले. जर तू आली नाही तर तुझ्या मुलाला मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे विवाहिता त्याला भेटण्यासाठी गेली. त्याने तिला दुचाकीवर बसवून वरोरा येथील एका हॉटेल मध्ये नेले व तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर त्याने वारंवार धमकी देऊन अत्याचार करीत असल्याने विववहितेने ही घटना घरी आपल्या पतीला सांगितली व वणी पोलिसात तक्रार दाखल केल्याने वणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोउनि माया चाटसे करीत आहे.