“उपेक्षितांचे आधारस्तंभ म्हणजे विजयबाबू चोरडिया’ : माजी केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी : नगरीतील सातत्याने सामाजीक उपक्रमामध्ये अग्रेसर असणारे, सेवाभावी व्यक्तीमत्वाचे धनी तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारनी सदस्य श्री विजयबाबू चोरडीया यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन विजयबाबू चोरडिया मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजीक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचा जन्मदिवस अत्यंत उत्साहवर्धक व उत्स्फूतपणे साजरा करण्यात आला.

त्यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमा अंतर्गत झरी तालुक्यातील अती दुर्गम भागातील सुर्ला येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील चिमुकल्या १०३ बालकांनी स्वताच्या खाऊचा पैसा गोळा करुन शाळेत शासनाने निर्धारीत केलेल्या कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करुन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक रमेश बोबडे व सरपंच व अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचे उपस्थितीत वाढदिवस साजरा करुन वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विजयबाबूच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच महावीर की रोटी उपक्रमाअंतर्गत आबडभवन समोर गरजूंना संपूर्ण कुटूंबीयांच्या उपस्थितीत अन्नदान करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळेवाटप व रुग्णाच्या बिछाण्यावरील आच्छादन वस्त्र प्रत्येकांना देण्यात आले. श्रीराम मंदिर येथे भविष्यातील कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना रुग्नांच्या व इतर व्याधिने ग्रस्त असलेल्या रुग्नाकरीता निस्वार्थ सेवा २४ तास रक्तदान ग्रुपच्या अथक परिश्रमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.

याप्रसंगी १०१ रक्तदात्यांनी सामाजीक दातृत्वाच्या भावनेतुन उत्स्फूंतपणे रक्तदान केले. सायंकाळच्या कार्यक्रमात श्री विनायक मंगल कार्यालय छोरीया ले – आऊट गणेशपूर येथे कोरोना काळातील कोरोना योद्धांचा व कोरोना काळात गरजूंना मदत करणाऱ्या विविध सामाजीक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान तसेच कोविड काळात मृत पावलेल्या कुटुंबातील निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री मा . हंसराजजी अहीर यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा भाजपा अध्यक्ष नितीनजी भुतडा हे होते . प्रमुख अतिथी म्हणून वणीचे आमदार संजयरेड्डी बोदकुरवार वणीचे नगराध्यक्ष तारेंद्रजी बोर्डेतहसिलदार विवेकजी पांडे, वणीचे ठाणेदार वैभवजी जाधव, लोढा हॉस्पीटलचे संचालक महेंद्रजी लोढा, ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती ( वणी, मारेगाव, झरीजामणी ) अध्यक्ष प्रदिपजी बोनगिरवार यांची व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी विजयबाबू चोरडीया हे उपेक्षितांचे आधारस्तंभ असुन सामाजीक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांचा आदथ समाजांनी अंगीकृत करावा असे गौरव उद्गार यांनी केले.

कोरोना काळातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यात अग्रेसर असलेले विविध वैद्यकिय अधिकारी, परिचारीका ( ग्रामीण रुग्नालय ) आशा सेविका, पोलीस अधिकारी व कर्मचारी, महसुल अधिकारी व कर्मचारी नगर परिषद आरोग्य कर्मचारी तसेच कोविडने मृत पावलेल्या मृत देहांवर अंत्यसंस्कार करणारे न.प.कर्मचारी, नगर परिषदेचे सर्व्हेक्षण ( कोविड ) करणारे व दंडपथकामध्ये जीवाची जोखीम पत्करुन सेवा देणारे न.प. शिक्षक तसेच शहरातील गरजुंना कोरोना काळात मदत करणाऱ्या १ ९ सेवाभावी संघटनेचा व कोविडमध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील १५ व्यक्तींना ५१०० / – रुपये राशी प्रदान करण्यात आली याप्रसंगी कोविड योद्धव सामाजीक सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर सेवा समितीचे संस्थापक श्री दिलीप कोरपेनवार यांनी केले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा मुख्याध्यापक रमेश बोबडे यांनी केले. उपस्थितांचे आभार स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक सागर जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विजयबाबू चोरडीया मित्र परिवार, वर्धमान फाउंडेशन, नगर सेवा समिती, श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती वणी, निस्वार्थ सेवा २४ तास रक्तदान ग्रुप वणी, गोविद स्वामी नागरी पतसंस्था वणी या समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.